IND Vs AUS 1st ODI  x
Sports

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

IND Vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने भारताचा पराभव केला.

Yash Shirke

Team India ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना आज (१९ ऑक्टोबर) पर्थ स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज विजय मिळवला. पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. पावसामुळे सामना अनेकदा थांबवण्यात आला. अनेकदा पाऊस पडल्याने सामन्यात २६ ओव्हर्सचा खेळ असेल असे घोषित करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही सलामीवीर जोडी मैदानात उतरली. रोहित शर्मा ८ धावा, शुभमन गिल १० धावा आणि विराट कोहली ० धावा करुन माघारी परतले. सुरुवातीलाच मोठे झटके देत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दबाव टाकला. त्यापाठोपाठ श्रेयस अय्यरही ११ धावांवर बाद झाला.

पहिले ४ फलंदाज बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी संयमी खेळी केली. अक्षर पटेलने ३१ धावा आणि केएल राहुलने ३८ धावा अशी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने १० धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये नितीश कुमार रेड्डीने दोन षटकार मारत झटपट १९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूड, मॅथ्यू कुन्हेमन आणि मिचेल ओवेन यांनी २ विकेट्स घेतल्या. नॅथन एलिस आणि मिचेल स्टाक यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले. २६ ओव्हर्समध्ये भारतीय संघाने ९ गडी गमावत १३९ धावा केल्या.

मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड ही ऑस्ट्रेलियन सलामीवीर जोडी फलंदाजीला आली. हेड ८ धावांवर बाद झाला, त्याच्यापाठोपाठ आलेला मॅथ्यू शॉर्ट देखील ८ धावा करुन माघारी परतला. मिचेल मार्शने नाबाद ४६ धावांची खेळी केली. जोश फिलिप्पेने ३७ धावांचे योगदान दिले. मॅट रेनशॉ नाबाद २१ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी १-१-१ विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT