टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आणि पावसामुळे प्रत्येक बाजूसाठी २५ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या या सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला.
गिलने कर्णधाराला साजेशी खेळी केली नाही, तर संघाला विजयदेखील मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाला पदार्पण करणाऱ्या युवा गोलंदाजांनी उत्कृष्ट सुरुवात करून दिली.
मात्र अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याने ५१ चेंडूंत १०२ धावांची शानदार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतु इतर फलंदाज भारतीय गोलंदाजीचा सामना करू शकले नाहीत. भारतासाठी आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि फिरकीपटू हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या दोन युवा खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अफगाणिस्तानचा डाव २४.५ षटकांत १९४ धावांत गुंडाळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.