prithvi shaw twitter
Sports

Prithvi Shaw: 'रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा..' MCA अधिकाऱ्याचा आरोपावर पृथ्वी शॉचं जोरदार प्रत्युत्तर

Prithvi Shaw News In Marathi: भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आपल्या फिटनेसमुळे आणि वागणूकीमुळे जोरदार चर्चेत आहे. दरम्यान त्याच्यावर MCA अधिकाऱ्याने आरोप केले होते.

Ankush Dhavre

भारतीय संघातून बाहेर असलेला पृथ्वी शॉ सध्या तुफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात पृथ्वी शॉ ला स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान तो आपल्या फिटनेस आणि डिसीप्लीनमुळे ट्रोल होतोय. त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

आता स्वतःचा बचाव करत त्याने स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरुन त्याने ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. त्याने ट्रोलर्सला उत्तर देत लिहिलंय की, जेव्हा जेव्हा एखाद्या विषयाची पूर्ण माहिती नसते, त्यावर बोलणं टाळावं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतर, पृथ्वी शॉ ने ही पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाला पृथ्वी शॉ?

पृथ्वी शॉ ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले, ' जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसते ना, तेव्हा गप बसावं. खूप लोकं काहीच माहीत नसताना आपली प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.'

काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वी शॉ खेळताना दिसून आला होता. मात्र एका अधिकाऱ्याने खुलासा केलाय की, मैदानात ११ खेळाडू असताना मुंबईचा संघ १० खेळाडूंसह खेळत होता. खराब फिटनेसमुळे पृथ्वी शॉ ला लपवावं लागत होतं.

भारताला अंडर १९ वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर पृथ्वी शॉ ला भारतीय संघात संधी दिली गेली होती. त्याची फलंदाजी पाहून त्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर असं म्हटलं गेलं होतं. त्याच्या फलंदाजीत वीरेंद्र सेहवागसारखी आक्रमकता होती. मात्र गेल्या वर्षांपासून तो आपल्या वागणुकीमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत आहे. त्यामुळे त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित होत नाहिये.

पृथ्वी शॉ केवळ आपल्या फिल्डींगमुळे चर्चेत नव्हता. तर त्याच्या वागणुकीमुळेही चर्चेत होता. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेवेळी तो रात्री बाहेर पडायचा, तर सरळ सकाळी ६ वाजता हॉटेलमध्ये परतायचा. संघातील वरिष्ठ खेळाडूंनीही त्याची तक्रार केली. फिटनेस, फॉर्म आणि वागणूक या तिन्ही गोष्टी नसल्याने त्याला संघातील स्थान गमवावं लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT