भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर हे पंजाब किंग्ज संघासाठी क्रिकेट विकास प्रमुख कार्यरत आहेत. आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. या लिलावात अनेक स्टार खेळाडू इकडे तिकडे होऊ शकतात.
माध्यमातील वृत्तानुसार, रोहित शर्माही मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतो, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान रोहित जर लिलावात आला, तर त्याच्यावर मोठी बोली लागेल असं वक्तव्य संजय बांगर यांनी केलं आहे.
पंजाब किंग्ज संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आले आणि गेले. मात्र या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. येत्या काही दिवसात मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाकडे मजबूत संघबांधणी करण्याची संधी असणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावात असणार आहेत. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाला योग्य प्लानिंग करणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
संजय बांगर यांनी द राव या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या पॉडकास्टमध्ये त्यांना रोहित शर्माबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. जर मुबंई इंडियन्सने रोहित शर्माला रिलीज केलं, तर पंजाब किंग्जचा काय प्लान असेल? या प्रश्नाचं उत्तर देताना संजय बांगर म्हणाले की, ' हा निर्णय लिलावाच्या वेळी किती रक्कम शिल्लक असेल, यावर अवलंबून असेल. जर तो लिलावात आला, तर त्याच्यावर मोठी बोली लागेल.'
रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्स संघात आहे. २०१३ मध्ये रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं.
मात्र आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती.
त्यामुळे हार्दिक पंड्यावर जोरदार टीका देखील केली गेली होती. हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. या स्पर्धेच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात शेवटी राहिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.