icc test rankings yashasvi jaiswal surpassed virat kohli in test ranking cricket news in marathi  saam tv news
क्रीडा

ICC Test Ranking: जलवा है हमारा..! जयस्वालने या बाबतीत किंग कोहलीलाही सोडलं मागे

Ankush Dhavre

ICC Test Rankings, Yashasvi Jaiswal:

आयसीसीने नुकताच कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वालने मोठी झेप घेतली आहे. तो विराटला (Virat Kohli) मागे सोडत आठव्या स्थानी पोहोचला आहे. तर विराट कोहली या या यादीत नवव्या स्थानी आहे.

नुकताच भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली. त्याने ८९ च्या सरासरीने ७१२ धावा केल्या. या शानदार कामगिरीच त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) गेल्या वर्षी वेस्टइंडिज दौऱ्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याने धावा केल्या. नुकताच इंग्लंडचा भारत दौरा समाप्त झाला आहे. या मालिकेदरम्यान यशस्वीने धावांचं वादळ आणलं. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ६८ पेक्षाही अधिकच्या सरासरीने १०२८ धावा केल्या आहेत.

रोहितची मोठी झेप..

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत सहाव्या स्थानी आहे. तो भारतीय संघाकडून या यादीत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितची बॅटही चांगलीच तळपली. ही मालिका सुरु होण्यापूर्वी तो टॉप १० मध्येच नव्हता. मात्र या मालिकेत धावांचा पाऊस पाडल्यानंतर तो सहाव्या स्थानी येऊन पोहोचला आहे. (Cricket news in marathi)

गोलंदाजीत आर अश्विन बनला नंबर १...

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आर अश्विन कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी होता. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण २६ गडी बाद केले. बुमराहने या मालिकेत १९ गडी बाद केले. दरम्यान कसोटी गोलंदाजांच्या यादीत अश्विन सर्वांना मागे सोडत नंबर १ गोलंदाज ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

SCROLL FOR NEXT