आयसीसीने टी २० रँकिंग जाहीर केली असून, भारताच्या खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे.  Saam TV
Sports

Cricket Ranking : टी २० रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ; भारताचा धाकड फलंदाज पहिल्या क्रमांकावर, बुमराहचीही मोठी झेप

ICC T20I Rankings Latest : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी २० रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांसह गोलंदाजांनीही कमाल केलीय. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांना फायदा झालाय. तर जसप्रीत बुमराहनंही मोठी झेप घेतलीय.

Nandkumar Joshi

ICC T20I rankings latest update : ICC ने बुधवारी कसोटी, वनडे आणि टी २० अशा तिन्ही फॉरमॅटची ताजी रँकिंग जाहीर केलीय. या यादीत मोठी उलथापालथ झालीय. T 20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा एका स्थानाने पुढे सरकला असून, दुसऱ्या स्थानी पोहोचलाय. त्याच्या खात्यात सध्या ८६२ गुण आहेत. विशेष म्हणजे फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तान संघाच्या साहिबजादा फरहानला (८४८) त्यानं मागं टाकलंय.

अभिषेकनं अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये ८२ आणि दुसऱ्या सामन्यात ३९ धावा केल्या. संजू सॅमसनही काही मागे नाही. तो चार पायऱ्या वर चढला असून, ३० व्या क्रमांकावर पोहोचलाय. सॅमसनने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक (५७) ठोकले. ईशान किशन (९१३ गुण) अव्वल स्थानी कायम आहे. त्यानं ४२ आणि नाबाद ३८ धावांची खेळी केली. ईशान आणि अभिषेकमध्ये ५१ गुणांचा फरक आहे.

बुमराहची टॉप १० मध्ये एन्ट्री

T 20 गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंना फायदा झाला. भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहनं ७ स्थानांची झेप घेतली असून, थेट दहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे ६५० गुण आहेत. त्यानं अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला दोन स्थानांचा फायदा झालाय. तो पाचव्या स्थानी आहे. अर्शदीप सिंग ११ स्थानांनी झेपावून थेट १४ व्या स्थानी पोहोचलाय. अक्षर पटेलला सहा स्थानांचा फायदा झालाय. तो २७ व्या क्रमांकावर आहे. वरुण दुखापतग्रस्त झाल्यामुळे फक्त पहिल्या सामन्यात खेळला आणि मालिकेतून बाहेर झाला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान नंबर १ टी २० गोलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाही काही कमी नाही...

हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ५९ धावांनी मिळालेल्या विजयानंतर तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फायदा झाला आहे. नॅथन एलिसनं पाच विकेट्स घेतल्यानंतर वनडे गोलंदाजांच्या यादीत २० स्थानांची झेप घेत २० व्या क्रमांकावर आलाय. मॅथ्यू रेनशॉनं १०९ धावांची शानदार खेळी केली. तो वनडे फलंदाजांच्या यादीत टॉप १०० च्या बाहेर होता आणि आता थेट ६८ व्या स्थानी पोहोचलाय. कूपर कॉनोली ७७ व्या स्थानी आहे.

कसोटीत बाबरला फायदा

ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन तिसऱ्या स्थानी पोहोचलाय. त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग (८५६) आहे. टेस्ट गोलंदाजांच्या यादीत त्याला दोन स्थानांचा फायदा झालाय. पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २१ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा जोश टंग ११ व्या स्थानी पोहोचलाय. त्यानं मालिकेत १९ विकेट्स घेऊन आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग (७४१) मिळवलंय. रॉबिन्सन बर्मिंघम येथील तिसऱ्या टेस्टमध्ये अर्धशतक ठोकल्यामुळे टेस्ट ऑलराउंडर्सच्या यादीत सात स्थानांनी वर सरकला आहे. तो थेट १३ व्या क्रमांकावर आलाय. टेस्ट फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम १३ व्या स्थानी, शान मसूद ३७ व्या, तर इंग्लंडचा कीपर जेमी स्मिथ २० व्या स्थानी पोहोचलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Visarjan Date: गौरीचे विसर्जन कोणत्या दिवशी करायचं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: मी मुंबईला जाणार - मनोज जरांगे

Ulhasnagar Crime: धक्का लागल्याचा राग डोक्यात गेला, भरचौकात दोघांचे तरुणासोबत भयंकर कृत्य

Pune Fort : पुण्याजवळचा २००० वर्षे जुना किल्ला, वास्तुरचनेत दडलेत अनेक ऐतिहासिक रहस्ये

Amrit Bharat Express: जळगावमार्गे धावणार नवी अमृत भारत एक्सप्रेस! धुळे आणि अमळनेर भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT