ICC T20I Ranking Suryakumar Yadav
ICC T20I Ranking Suryakumar Yadav SAAM TV
क्रीडा | IPL

Suryakumar Yadav T20 Ranking: सूर्यकुमार यादवचा टी २० रँकिंगमध्ये 'धमाका' सुरूच; विश्वविक्रम मोडण्याची संधी

Nandkumar Joshi

Suryakumar Yadav T20 I Rankings : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यागणिक त्याच्या नावावर आता विक्रमांची नोंद होत आहे.

सध्याच्या घडीला सूर्यकुमार हा आयसीसी (ICC) च्या टी २० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याची सर्वोत्तम रेटिंग ९१० आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेच्या पहिल्या सामन्यात ४७ धावांची खेळी करून त्याने ही झेप घेतली होती. (Cricket News)

न्यूझीलंडविरुद्धच्या (Ind Vs NZ) मालिकेतील दुसऱ्या टी २० सामन्यात सूर्यकुमार यादव याने नाबाद २६ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर सूर्यकुमारच्या रेटिंगमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. त्याचे ९०८ गुण आहेत.

आता न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात सूर्यकुमारने शतक ठोकलं किंवा त्याच्या जवळपास जरी धावा केल्या तर, त्याला नवा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे. (Sports News)

सूर्याच्या निशाण्यावर 'हा' खेळाडू

सूर्यकुमार यादव हा आयसीसी टी २० रँकिंगच्या (T20 I Ranking) इतिहासात सर्वोत्तम रेटिंग मिळवलेला दुसरा खेळाडू आहे. याबाबतीत डेविड मलान हा अव्वल स्थानी आहे. मलानने आतापर्यंत सर्वाधिक ९१५ गुण मिळवलेले आहेत. त्याने २०२० मध्ये हा विक्रम नोंदवला होता.

अहमदाबादमध्ये सूर्य तळपणार का?

अहमदाबादमध्ये आज, १ फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी २० सामना होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट तळपणार का, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या सामन्यात सूर्यकुमारने धमाका केला तर, तो ९१५ गुण प्राप्त करू शकतो. त्यामुळे याबाबतीत तो मलानला मागे टाकून एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकतो.

टॉप १० मध्ये सूर्यकुमार एकमेव भारतीय

आयसीसीच्या विद्यमान टी २० रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव हा ९०८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान हा ८३६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर फलंदाजांच्या अव्वल १० जणांच्या यादीत सूर्यकुमार हा एकमेव भारतीय आहे. विराट कोहली हा १४ व्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT