icc t20 world cup 2024 warm up matches schedule team india will play against bangladesh amd2000 saam tv
क्रीडा

T-20 World Cup 2024: T-20 WC स्पर्धेतील सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया या संघासोबत करणार दोन हात

Ankush Dhavre

भारतीय संघ लवकरच टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. येत्या १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. दरम्यान भारतीय संघ बांगलादेश संघाविरुद्ध सराव सामना खेळताना दिसून येऊ शकतो. आयसीसीची स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्व संघांना कमीत कमी २ सराव सामने खेळण्याची संधी मिळते. मात्र यावेळी केवळ १ सराव सामना खेळण्याची संधी मिळू शकते.

भारतात सध्या आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मे रोजी खेळवला जाईल. त्यानंतर आवठड्याभरानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघचे तिन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. त्यामुळे प्रवास टाळता यावा म्हणून भारतीय संघाला सराव सामना अमेरिकेतच खेळायचा आहे. तर इतर सामने डलास आणि मायामीमध्ये रंगणार आहेत.

भारतीय क्रिकेट बोर्डच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं वेळापत्रक खूप जास्त व्यस्त आहे. याचं आणखी व्यवस्थित नियोजन करता येऊ शकलं असतं. आयपीएल फायनल आणि टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उद्घाटनाचा कालावधी वाढवायला हवा होता.

इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ देखील स्पर्धेच्या २४ तासांपूर्वी द्विपक्षीय मालिका खेळणार आहे.' टी-२० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांकडेही टी-२० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी १ सराव सामना खेळता येईल, इतकाच वेळ असणार आहे. या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील शेवटचा टी-२० सामना ३० मे रोजी होणार आहे. पाकिस्तानचा संघ आपला पहिला सामना ६ जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. तर इंग्लंडचा संघ ४ जून रोजी स्कॉटलँडविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.

असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक

५ जून - भारत विरुद्ध आयर्लंड

८ जून - भारत विरुद्ध पाकिस्तान

१२ जून - भारत विरुद्ध अमेरिका

१५ जून- भारत विरुद्ध कॅनडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT