usa vs can match highlights twitter/icc
Sports

USA vs CAN: यजमान अमेरिकेची विजयी सलामी! कॅनडाला नमवत T-20 WC स्पर्धेत मिळवला ऐतिहासिक विजय

USA vs CAN, T-20 World Cup Highlights: यजमान अमेरिकेने पहिल्याच सामन्यात कॅनडाने शानदार खेळ करत ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात यजमान अमेरिकेने ७ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कॅनडाने ५ गडी बाद १९४ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने १७.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण करत ७ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करत असताना २० षटक अखेर ५ गडी बाद १९४ धावा केल्या. कॅनडाकडून खेळताना नवनीत धालीवालने ४४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. या डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेच्या फलंदाजांनी कॅनडाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत १७.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. स्टीवन टेलर शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार मोनांक पटेल आणि अँड्रीस गुसने दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अँड्रीस गुस आणि ॲरोन जोन्सने १३१ धावा जोडत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं

शेवटी कोरी अँडरसन आणि ॲरोन जोन्सने चौथ्या विकेटसाठी नाबाद २४ धावा जोडत, अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. जोन्सने नाबाद ९४ धावांची खेळी केली. तर कोरी अँडरसन ३ धावा करत नाबाद परतला. अमेरिकेचा हा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील पहिला विजय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

Numerlogy Prediction : मूलांक ३ वर पैशांचा पाऊस, मूलांक ५ ची होणार प्रगती; जन्म तारखेवरून जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Navi Mumbai: कारवाईला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? बेकायदा इमारत प्रकरणी हायकोर्टाचा एकनाथ शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT