rohit sharma with babar azam saam tv
क्रीडा

IND vs PAK, T20 World Cup: भारत- पाकिस्तान सामना रद्द होणार? या एका नियमामुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन

ICC T20 World Cup 2024, IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला येत्या १ जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढत ९ जून रोजी रंगणार आहे. या सामन्यात भारताचा संघ पाकिस्तानसोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. मात्र हा सामना पावसामुळे धुतला जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळताना दिसून येत नाही. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. हा सामना ९ जून रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. दरम्यान या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे.

साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस नाही

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, न्यूयॉर्कमध्ये सकाळी ६- ७ च्या दरम्यान ऊन असेल. मात्र सामन्याच्या वेळी पाऊस पडू शकतो. दोन्ही संघांचं टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस नसणार आहे. आयसीसीने पहिल्या सेमीफायनलसाठी राखीव दिवसाची घोषणा केली आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस नसणार आहे. जर सामन्यात पावसाने हजेरी लावली. तर कमीत कमी ५-५ षटकांचा सामना खेळवला जाईल. मात्र हे शक्य न झाल्यास सामना रद्द केला जाईल आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल.

जर भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला, तर ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरु शकते. कारण सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. त्यामुळे रोहित शर्माला सेमीफायनलमध्ये जाणं कठीण होऊ शकतं. हा सामना रद्द झाल्यानंतर भारतीय संघाला पुढील तिन्ही सामने जिंकावे लागतील. ७ गुणांसह भारतीय संघ पुढे जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT