england cricket team google
क्रीडा

ICC T20 World Cup 2024: टी -२० वर्ल्डकप विजेता संघ होणार कोट्यवधी! तर उपविजेत्या संघावरही पडणार पैशांचा पाऊस

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला येत्या २ जूनपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये संयुक्तरित्या खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला असून त्यांनी न्यूयॉर्कमध्ये सराव करायला देखील सुरुवात केली आहे. नुकताच आयपीएल २०२४ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विजेता आणि उपविजेत्या संघावर पैशांचा वर्षाव करण्यात आला होता. दरम्यान आयसीसी टी -२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघावर देखील पैशांचा वर्षाव केला जाणार आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील विजेता संघाला किती रुपये मिळणार याबाबत आयसीसीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. मात्र २०२२ मध्ये मिळालेल्या रकमेवरून अंदाज लावता येऊ शकतो.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत विजेत्या संघांना एकूण ५.६ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ४६.६ कोटी रुपये दिले गेले होते. गेल्या हंगामात एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी आयसीसीने संघांची संख्या २० केली आहे. गतवर्षी झालेल्या हंगामात इंग्लंडचा संघ जेतेपदाचा मानकरी ठरला होता. इंग्लंडला १३ कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला ६.४४ कोटी रुपये मिळाले होते.

या स्पर्धेत केवळ विजेता आणि उपविजेता नव्हे तर सेमीफायनल गाठणाऱ्या संघांवरही पैशांचा वर्षाव केला जातो. ज्यात भारत आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश होता. भारतीय संघाला ३.२५ कोटी रुपये तर न्यूझीलंड संघालाही ३.२५ कोटी रुपये मिळाले होते. इतकेच नव्हे तर सुपर ८ गाठणाऱ्या संघांवरही पैशांचा वर्षाव केला जातो. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला १० गडी राखून पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT