IND vs PAK: सामान्याआधी 'बाबर आझम'ला खुलेआम धमकी; जाणून घ्या प्रकरण Saam TV
Sports

IND vs PAK: सामान्याआधी 'बाबर आझम'ला खुलेआम धमकी; जाणून घ्या प्रकरण

टी 20 विश्वचषक (T-20 World Cup) आजपासून (17 ऑक्टोबर) सुरू होणार आहे.

वृत्तसंस्था

टी 20 विश्वचषक (T-20 World Cup) आजपासून (17 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आणि पाकिस्तान (IND vs PAK T20) आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. क्रिकेट चाहते या मोठ्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, पण खेळाडूंना त्याअगोदर धमक्या येऊ लागल्या आहेत. एका चाहत्याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला उघडपणे धमकी दिली आहे.

वास्तविक, 15 ऑक्टोबर रोजी यूएईला निघत असतानाचा, एक फोट बाबर आझमने सोशल मीडियावर शेअर केला. त्यात असेही लिहिले होते की, 'तुमच्या (चाहत्यांच्या) समर्थनापेक्षा काहीही मोठे नाही. नेहमी तुम्ही संघाच्या पाठीशी उभे रहा. समर्थन करा, प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा.'' बाबर आझमच्या या पोस्टला उत्तर देताना एका चाहत्याने लिहिले, '24 ऑक्टोबरला (भारताविरुद्ध) सामना जिंक, नाहीतर मी तुला घरी येऊ देणार नाही.'

दुसर्‍या वापरकर्त्याने बाबर आझमच्या पोस्टवर एक व्हिडिओ शेअर केला. तसेच धमकी देणाऱ्या शब्दात लिहिले की ही शेवटची संधी आहे बाबर भाई. त्याचबरोबर बाबर आझमने हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकण्याचे बोलले आहे. स्पर्धेपूर्वी बाबर म्हणाला की आम्हाला युएईमधील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण आम्ही गेली ३ वर्षे येथे क्रिकेट खेळत आहोत. आम्हाला माहित आहे की येथे खेळपट्टी कशी आहे. सामन्याच्या दिवशी जो संघ अधिक चांगले खेळेल तो जिंकेल. मला विश्वास आहे की आपण जिंकू.

क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 टी -20 मध्ये पाकिस्तानला (IND vs PAK T20) पराभूत केले आहे. तर पाकिस्तानने फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित एक सामना टाय होता. 25 डिसेंबर 2012 रोजी पाकिस्तान संघाने एकमेव सामना जिंकला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ballaleshwar Temple Pali : नाद करायचा नाय! पूजेचं साहित्य विकणाऱ्या मराठी व्यावसायिकचा दुकानात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत थाई भाषेतून संवाद; पर्यटक आवाक

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT