ICC T-20 Ranking: राहूल टॉप 5 मध्ये तर कोहलीच्या स्थानात घसरण Twitter
क्रीडा

ICC T-20 Ranking: राहूल टॉप 5 मध्ये तर कोहलीच्या स्थानात घसरण

परंतु अगोदरच्या सामन्यात केएल राहूल अपयशी ठरला त्यामुळे भारताला सेमिफायनलमध्ये जाता आले नाही.

वृत्तसंस्था

ICC T-20 Ranking: बुधवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या ICC पुरुषांच्या T20 क्रमवारीत भारताचा केएल राहुल (KL Rahul) पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, परंतु विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रमवारीत चार स्थानांनी घसरन होवून आठव्या स्थानावर गेला आहे. T-20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध संघर्ष केल्यानंतर भारताच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावणारा राहुल पाचव्या क्रमांकावर पोहोचला.

केएल राहूलने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध नाबाद 69, 50 आणि 54 धावा केल्या. परंतु अगोदरच्या सामन्यात केएल राहूल अपयशी ठरला त्यामुळे भारताला सेमिफायनलमध्ये जाता आले नाही. इतरांमध्ये, दक्षीण आफ्रिकेचा एडेन मार्करामच्या नाबाद 52 धावांच्या खेळीच्या जोरावर 3 ऱ्या क्रमांकावर आला आहे. मार्करामची बॅट या विश्वचषकात चांगलीच तळपली होती. त्यामुळे त्याला क्रमवारीत 7 स्थानांचा फायदा झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर ड्युसेननेही फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल 10 मध्ये प्रवेश केला आणि ताज्या यादीमध्ये तो 10 व्या क्रमांकावर आला आहे. व्हॅन डर डुसेनने इंग्लंडविरुद्ध नाबाद 94 धावांची खेळी केली होती. ही खेळी आफ्रिकेला सेमिफायनलमध्ये घेवून गेली नाही. कारण रन रेट कमी पडत होता.

गोलंदाजांच्या क्रमवारीत अॅडम झम्पा आणि जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियन जोडीने अव्वल 10 मध्ये स्थान पटकावले आहे. दोन्ही गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. झम्पाच्या बांगलादेशविरुद्धच्या पाच विकेटमुळे त्याला 5 स्थानांचा फायदा झाला आहे, तर हेझलवूडने वेस्ट इंडिजविरुद्ध चार बळी घेतल्यामुळे त्याला 11 स्थानांचा फायदा होत 8 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पहिल्या 10 मध्ये टीम साउथी आहे ज्याने गोलंदाजी क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांनी अष्टपैलूंच्या क्रमवारीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मॅक्सवेल तीन स्थानांनी वर जाऊन चौथा क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे तर मार्श पाच स्थानांनी वर येऊन 9 व्या क्रमांकावर आहे . श्रीलंकेचा वानिंदू हसरंगाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 3 ऱ्या क्रमांकावर आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN 2.0: पॅन कार्ड 2.0 म्हणजे नक्की काय? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिक

Ola Electric Scooter: ई-सायकलीच्या किंमतीत मिळणार ओलाची नवीकोरी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Thank आणि Thank You यामधील नेमका फरक माहितीये का?

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Viral Video: हद्दच झाली! बाजारात अश्लील डान्स नंतर नागरिकांनी धु धु धुतले; तरुणाच्या कारनाम्याचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT