england cricket team saam tv
Sports

ICC Player Of The Month: जुलै महिन्याच्या प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा; या खेळाडूंना मिळाला मान

Player Of The Month Award: जुलै महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

ICC: जुलै महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सची आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. या खेळाडूने ॲशेस मालिकेत दमदार कामगिरी केली होती.

तर ऑस्ट्रेलियाची खेळाडू ॲशले गार्डनरची वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह तिच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

ॲशले गार्डनरने रचला इतिहास..

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील खेळाडू ॲशले गार्डनरची जून महिन्यात देखील प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली होती. आता जुलै महिन्यात देखील दमदार कामगिरीचं फळ म्हणून तिची प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह तिच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ती सलग दोन वेळेस प्लेअर ऑफ द पुरस्कार पटकावणारी ॲशले गार्डनर ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. (Latest sports updates)

ॲशेस मालिकेत ख्रिस वोक्सची दमदार कामगिरी..

काही दिवसांपूर्वीच इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिकेचा थरार रंगला. या मालिकेत इंग्लंडकडून ख्रिस वोक्स चमकला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवड करण्यात आली होती. मुख्य बाब म्हणजे सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला खेळायची संधी मिळाली नव्हती.

या दोन्ही सामन्यांमध्ये यजमान इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत ख्रिस वोक्सचे कमबॅक पाहायला मिळाले होते. इथून पुढे इंग्लंडने २ सामने जिंकले. तर १ सामना अनिर्णित राहिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

SCROLL FOR NEXT