ICC ODI World Cup 2023 start today England vs New Zealand Match Live Updates Team India schedule in marathi Saam TV
क्रीडा

ICC World Cup 2023: आयसीसी वनडे वर्ल्डकपला आजपासून सुरुवात; सामने कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?

Satish Daud

Icc Odi World Cup 2023 Live Updates 

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा वनडे वर्ल्डकपला आजपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार असून पुढील ४५ दिवस क्रिडाप्रेमींना सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे पहिला सामना जिंकून कोणता संघ वर्ल्डकपचा (ICC World Cup 2023) श्रीगणेशा करणार याकडेच क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून असेल. आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे एकूण भारतातील १० शहरांमधील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.

दरम्यान, यंदाच्या वर्ल्डकपचे सामने प्रेक्षकांना मोबाईलवर फुकटात पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स या क्रिडावाहिनीवर प्रेक्षकांना वर्ल्डकपचे सामने पाहता येतील. याशिवाय मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अँपद्वारे देखील सामन्यांचा थरार पाहता येणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी क्रिडाप्रेमींना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.

हे सर्व सामने फुकटात पाहता येणार आहे. याआधी हॉटस्टारवर मॅच पाहण्यासाठी क्रिडाप्रेमींना खिसा रिकामा करायला लागयचा. मात्र, आता वाढत्या स्पर्धेमुळे हॉटस्टारने सामने फुकटात दाखवण्याचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्ल्डकपमधील सामन्यांचं भारतीय संघाचं वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, ८ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, ११ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, १४ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे, १९ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा, २२ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ, २९ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई, २ नोव्हेंबर.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, ५ नोव्हेंबर.

भारत विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरु, १२ नोव्हेंबर.

वर्ल्डकपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT