ODI World Cup, BCCI, Team India SAAM TV
Sports

ODI WC 2023 : वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठी अपडेट आली समोर! केव्हा, कधी आणि कुठे रंगणार सामने? वाचा..

ODI World cup 2023 Schedule: ही स्पर्धा कधी सुरु होणार आणि या स्पर्धेचा अंतिम सामना केव्हा पार पडणार. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

ODI wc 2023: यावर्षी भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

आता ही स्पर्धा कधी सुरु होणार आणि या स्पर्धेचा अंतिम सामना केव्हा पार पडणार. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी होऊ शकते. तर स्पर्धेतील पहिला सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम खेळवला जाऊ शकतो. (Latest sports updates)

इतकेच नव्हे तर बीसीसीआयच्या सूत्राने असे देखील म्हटले आहे की, स्पर्धेचा अंतिम सामना देखील याच मैदानावर खेळावला जाऊ शकतो. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाऊ शकतो.

असे देखील म्हटले जात आहे की, भारतात आयोजित होणाऱ्या या स्पर्धेतील सामने १२ वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जाऊ शकतात.

ज्यात ३ नॉकआउटसह ४८ सामन्यांचा समावेश असणार आहे. अहमदाबादसह दिल्ली, लखनउ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाळा, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, इंदूर, राजकोट आणि मुंबईत हे सामने खेळवले जाऊ शकतात.

आतापर्यंत बीसीसीआयने कुठलीही माहिती दिली नाहीये. कारण पावसामुळे कार्यक्रमात बदल केला जाऊ शकतो. सर्व गोष्टींचा विचार करून कार्यक्रमाची रूपरेखा ठरवली जाईल. तसं तर वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक १ वर्षांपूर्वी जाहीर केले जाते.

मात्र आयसीसी अजूनही भारत सरकारच्या अनुमतीची वाट पाहत आहे. तसेच पाकिस्तान संघाला देखील भारतात येण्यासाठी व्हिजा दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT