team india saam tv news
Sports

World Cup 2023: ऑस्ट्रेलिया जगज्जेता, पण ICC च्या संघात टीम इंडियाचेच वर्चस्व! रोहितसह ६ भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान

ICC Team Of The Tournament: ही स्पर्धा झाल्यानंतर आयसीसीने टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

ICC Named World Cup Team Of The Tournament:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा समारोप झाला आहे. पुन्हा एकदा भारतीय संघाचं वर्ल्डकप ट्ऱॉफी जिंकण्याचं स्वप्न तुटलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सलग १० सामने जिंकून वर्ल्डकपची फायनल गाठली होती.

मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचं स्वप्न भंग केलं आणि चौथ्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर कब्जा केला. हा सामना झाल्यानंतर आयसीसीने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली. या संघात ६ भारतीय खेळाडूंना स्थान दिलं गेलं आहे.

या खेळाडूंना मिळालं स्थान...

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर आयसीसीने सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या ११ खेळाडूंमध्ये ६ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ज्यात रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. (ICC Team Of The Tournament)

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीने या स्पर्धेत फलंदाजी करताना सर्वाधिक ७६५ धावा चोपल्या. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने सर्वाधिक २४ गडी बाद केले आहेत .

या खेळाडूकडे नेतृत्वाची धूरा..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे आयसीसीच्या प्लेइंग ११ चे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने सलग १० सामन्यांमध्ये विजय मिळवला.

तर फलंदाजी करताना त्याने ५९७ धावा चोपल्या. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८४ चेंडूंचा सामना करत १३१ धावांची खेळी केली होती. रोहितसह जसप्रीत बुमराहनेही भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने गोलंदाजी करताना २० गडी बाद केले. (Latest sports updates)

वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघातून ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, श्रीलंकेचा दिलशान मदुशंका आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

अशी आहे आयसीसीने निवडलेली वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), विराट कोहली, डॅरिल मिचेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झाम्पा, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT