ICC Men's T20 World Cup Saam Digital
क्रीडा

ICC Men's T20 World Cup : थोडी खुशी..थोडा गम; भारताच्या तीन दिग्गज खेळाडूंची एकाचवेळी निवृत्ती मनाला चटका लावणारी

India Cricket team : २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचे तीन दिग्गज खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sandeep Gawade

भारतीय क्रिकेट संघाने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकावर मोहोर उमटवली. सांघिक खेळाचं प्रदर्शन करत करोडो भारतीयांची मने जिंकली. मात्र विश्वचषकाचा जल्लोष सुरू असताना विराट कोहलीने टी-२० तून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर रोहित शर्मानेही निवृत्ती जाहीर केली आणि आज अष्टपैलू रविंद्र जडेजाने निवृ्ती जाहीर केली. एकाच वेळी तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर करणारी ही क्रिकेट विश्वातील पहिलीच घटना असेल. त्यामुळे विश्वचषकाच्या विजयाचा आनंद क्रिकेट चाहत्यांसाठी थोडी खुशी, थोडा गम असाच ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांध्ये आता तो आक्रमकपणा, कव्हर ड्राईव्ह, षटकार, चौकांरांची आतषबाजी आणि फिरकी गोलंदाजीसह मोक्याच्या ठिकाणी फलंदाजी पहायला मिळणार नाही. त्यांची जागा नवीन फलंदाज, गोलंजात घेतील. पण या तिघांची उणीव नेहमीच जाणवेलं.

विराट कोहलीची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

एकूण T20 सामने: 125

धावा: 4188

सरासरी: ४८.६९

स्ट्राइक रेट: 137.04

शतक : १

अर्धशतके : ३८

षटकार : १२४

चौकार: 369

क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटचा रोहित शर्मा बादशाह आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी20 159 सामन्यांमध्ये 4231 धावा केल्या आहेत. 20 ओव्हरच्या या शॉर्ट फॉरमॅटमध्ये त्याची ५ शतकं आहेत. हा देखील एक विक्रमच आहे.

जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून रविंद्र जडेजाची ओळख आहे. २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी २० प्रकारात त्याने पदार्पण केलं होतं. त्याने ७४ सामने खेळले असून. ५१५ धावा केल्यात आणि ५४ विकेट घेतले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT