Maharashtra News Live Updates: पुणे कंन्टोनमेंटमधून सुनिल कांबळे यांना वेटिंगवर ठेवल्याने इच्छुकांची गर्दी वाढली

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 22 October 2024: आज मंगळवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडीचा जागावाटपाबाबत निर्णय, आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Pune News: पुणे कंन्टोनमेंटमधून सुनिल कांबळे यांना वेटिंगवर ठेवल्याने इच्छुकांची गर्दी वाढली

पुणे कंन्टोनमेंटमधून सुनिल कांबळे यांना वेटिंगवर ठेवल्याने इच्छुकांची गर्दी वाढली

पुण्यातील भाजपचे डॉ. भरत वैरागे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

वैरागे पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक

भरत वैरागे पुणे कंन्टोनमेंट मतदारसंघातून इच्छुक

पहिल्या यादीत पुणे कंन्टोनमेंट मतदारसंघातील विद्यामान आमदार सुनिल कांबळे यांनी काल फडणवीस यांची भेट घेतली होती

Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशिया दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशिया दौऱ्यावर

ब्रिक्स परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी नरेंद्र मोदी रशियात

भारत हा ब्रिक्स समूहाचा सदस्य

रशिया, चिन व भारताच्या दृष्टिने दौरा महत्वाचा

Mumbai News:  बाबा सिद्दिकींच्या हत्येत वापरण्यात आलेले पिस्तूल पाकिस्तानची, पोलिसांचा संशय

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत वापरण्यात आलेली पिस्तूल पाकिस्तानातून तस्करी केल्याचा पोलिसांना संशय

पाकिस्तानातून राजस्थान सीमेवरून पिस्तूल देशात आल्याचा पोलिसांना संशय

आत्ता पर्यंत तीन पिस्तूल आणि २८ काडतुस पोलिसांनी केली जप्त

तर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघा मारेकऱ्यांसह एकूण १० जणांना आत्ता पर्यंत अटक

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, काँग्रेसची आज महत्वाची बैठक

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस

जिल्हा कार्यालयात काँग्रेसची आज महत्वाची बैठक

काँग्रेसला जिल्ह्यात एकही जागा मिळत नसल्याने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज

राजापूर मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात काँग्रेस निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता

काँग्रेस वेगळी भूमिका घेण्याची शक्यता

बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष आणि राजापूरमधून इच्छूक असलेले अविनाश लाड भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

राजापूरमध्ये सांगली पॅटर्न होण्याची शक्यता

राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन साळवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित त्यामुळे काँग्रेस आक्रमक

Chinchwad News: चिंचवड विधानसभेच्या जागेवरून आज शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता

चिंचवड विधानसभेच्या जागेवरून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबईमध्ये आज सुप्रिया सुळे जयंत पाटील हे शरद पवार यांची चिंचवड विधानसभेच्या जागेवर होणार बैठक

चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नाना काटे यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी घोषित करायची

का शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना पक्ष प्रवेश देऊन चिंचवड विधानसभेचे उमेदवारी घोषित करायची यावर होणार चर्चा

Mumbai News: विधीसंंघर्ष मुलाने दुसऱ्या मुलावर केले अनैसर्गिक अत्याचार, डोंगरी बालसुधारगृहातील घटना

डोंगरी बालसुधारगृहात विधीसंंघर्ष मुलाने बराकमधील दुसऱ्या मुलावर केले अनैसर्गिक अत्याचार

बळीत अल्पवयीन मुलगा नैसर्गिक विधीसाठी गेला असता घडला प्रकार

आरोपी मुलाने तरुणाच्या तोंडात गोळ्यांच पाकिट आणि पांढऱ्या रंगाची पावडर कोंबून केले अनैसर्गिक अत्याचार

डोंगरी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याच्या ४, ८, १२ कलमांतर्गत गुन्हा दाखल

Nandurbar News: राजेंद्र गावित यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले राजेंद्र गावित यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

राजेंद्र गावित यांनी दिली होती काँग्रेसची मुलाखत मात्र ऐन वेळेस सेना नेत्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये येण्याच दिले होते संकेत

मात्र आता सेना नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने नेमकी कोणाची घेणार उमेदवारी?

Nanded News: नांदेड भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड भूकंपाच्या धक्क्याने हादरले

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव, मनाठा गावांना बसला भूकंपाचा सौम्य धक्का

3 पूर्णाक 8 रिस्टर स्केल भूकंपाची नोंद

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Delhi News: २०२६ला बदलणार महाराष्ट्रातील या ५ विधानसभा मतदारसंघाची नावे

२०२६ ला बदलणार महाराष्ट्रातील या ६ विधानसभा मतदारसंघाची नावे

राज्यातील ३ लोकसभा मतदारसंघांचीही नावे बदलणार

डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार

मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) असतो

औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी ३ नावात होणार बदल

औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे नाव बदलणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com