Sanju Samson ICC T20I Ranking: भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसनला गेल्या सामन्यात शून्यावर माघारी परतावं लागलं होतं. मात्र शून्यावर माघारी परतण्यापूर्वी त्याने गेल्या दोन्ही सामन्यात वादळी शतकी खेळी केली होती. यासह भारतीय संघासाठी सलग २ सामन्यांमध्ये २ शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.
यापूर्वी कुठल्याच भारतीय फलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता.या दमदार कामगिरीचा संजू सॅमसनला चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये संजू सॅमसनने मोठी झेप घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वी संजू सॅमसनने आयसीसी रँकिंगमध्ये ६६ व्या स्थानी होता. मात्र पहिल्याच सामन्यातील शतकी खेळीनंतर संजू्ला आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याने २७ स्थानांची झेप घेतली, ३९ वे स्थान गाठले आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. जर त्याने दुसऱ्या सामन्यातही मोठी खेळी केली असती, तर त्याला रँकिंगमध्ये आणखी फायदा होऊ शकला असता. कारण एका शतकी खेळीमुळे त्याची रेटिंग ही ५५० वर जाऊन पोहोचली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील आतापर्यंत २ सामने झाले आहेत. मालिकेतील आणखी २ सामने शिल्लक आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये जर त्याने मोठी खेळी केली. तर तो रँकिंगमध्ये आणखी वर जाऊ शकतो. जर पुढील दोन्ही सामन्यात त्याने २ शतकं झळकावली, तर तो टॉप १५ मध्येही प्रवेश करु शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६१ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केलं. यासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.