Chris Broad On BCCI google
Sports

Chris Broad On BCCI: मला एक फोन आला अन्...ICC च्या मॅच रेफरीचे बीसीसीआयवर गंभीर आरोप, सौरव गांगुलीही वादाच्या भोवऱ्यात

ICC Referee Chris Broad Allegations On Sourabh Ganguly: आयसीसीचे मॅच रेफरी क्रिस ब्रॉड यांनी बीसीसीआयवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसचे त्यांनी माजी अध्यक्ष सौरव गांगुलीवरही गंभीर आरोप केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उद्यापासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटर आणि आयसीसीचे पूर्व मॅच रेफरी क्रिस ब्रॉड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी भारतीय संघ तसेच माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर गंभीर आरोप केले. बीबीसीआयने क्रिकेट नियमांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

क्रिस ब्रॉड यांचे बीसीसीआयवर गंभीर आरोप

क्रिस ब्रॉडने टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला की, "एका सामन्यात टीम इंडिया ३-४ ओव्हर मागे होती, ज्यामुळे आपोआप दंड आकारला गेला असता. परंतु, दंड टाळण्यासाठी मला एक फोन आला. यामुळे भारताचा स्लो ओव्हर रेट कमी करण्याच्या वेळेत बदल करावा लागला. आम्हाला थोडा वेळ घ्यावा लागला आणि ओव्हर-रेट निर्धारित वेळेच्या मर्यादेपेक्षा कमी करावा लागला'.

क्रिस ब्रॉड म्हणाले की, जेव्हा ते मॅच रेफरी होते तेव्हा त्यांना एक फोन आला होता, ज्यामध्ये त्यांनी भारताविरुद्ध 'नम्रपणाने वागण्यास' आणि स्लो ओव्हर रेटसाठी दंड टाळण्यासाठी सांगितले होते.परंतु त्यांनी हा फोन कोणी केला हे उघड केले नाही. शिवाय, त्यांना सामना किंवा भारतीय संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळत होता हे आठवत नव्हते.

सौरव गांगुलीवर राजकारण करण्याचे आरोप

क्रिस ब्रॉड पुढे म्हणाले की, भारताकडे खूप पैसा आहे आणि त्यांनी अनेक बाबतीत आयसीसीला मागे टाकले आहे. मला आनंद आहे की मी आता या जगापासून दूर आहे, कारण येथे पूर्वीपेक्षा जास्त राजकारण आहे. त्यांनी सौरव गांगुलीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, पुढच्याच सामन्यात पुन्हा असेच घडले. सौरव गांगुलीने कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाही, म्हणून मी त्याला फोन केला आणि विचारले, 'मी काय करावे असे तुम्हाला वाटते?' गांगुली म्हणाला, 'फक्त तुमचे काम करा.' ब्रॉड पुढे म्हणाले की, "येथे राजकारण आहे. क्रिस ब्रॉडच्या या गंभीर आरोपपांवर बीसीसीआयने अद्याप या उत्तर दिलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : स्वच्छ वाळू, जलक्रीडा अन् मनमोहक सूर्यास्त, कोकणच्या कुशीत वसलंय 'हे' अद्भुत ठिकाण

मुंबईत भाजपचीच सत्ता, ४० वर्षानंतर मायानगरीवर राज्य करणार; महापौरपदासाठी कुणाची नावे आघाडीवर?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील शिरूर आढळून आले तब्बल २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ

Chanakya Niti: या 2 गोष्टींना घाबरणारे लोक आयुष्यात कधीच मिळवत नाहीत पैसा, सत्य वाचून बसेल धक्का

भारतीय वायूसेनेचं विमान थेट तलावात, भीषण स्फोट अन् धुराचे लोट; पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT