sanju samson  twitter
Sports

Sanju Samson: संजू सॅमसनवर पुन्हा अन्याय होणार? Champions Trophy साठी संधी मिळणं कठीण; काय आहे कारण?

Sanju Samson, Team India Squad For Champions Trophy 2025: येत्या काही दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात संजूला स्थान मिळणं कठीण आहे.

Ankush Dhavre

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची क्रिकेट कारकिर्द ही रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी राहिलेली नाही. त्याला संघात संधी मिळाली, पण संघात स्थान टिकवून ठेवता आलं नाही. संजूने गेल्या काही महिन्यांत टी-२० क्रिकेटमध्ये दमदार खेळ करुन दाखवला आहे.

त्याला सातत्याने टी-२० संघात संधी दिली जात आहे आणि त्याने या संधीचं सोनं देखील केकलं आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने बॅक टू बॅक शतकं झळकावली होती. यासह त्याने टी-२० संघात तर स्थान पक्क केलंय, पण वनडे क्रिकेटमध्ये त्याला अजूनही आपला ठस्सा उमटवता आलेला नाही.

आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. या संघात संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आधीपासूनच चांगली कामगिरी केली आहे. मात्र तरीही त्याला वनडे संघात स्थान दिलं गेलं नव्हतं.

संजूच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०२१ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याला केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ५६.७ च्या सरासरीने ५१० धावा केल्या आहेत. त्याच्या नावे १ शतक आणि ३ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे. त्याची ही कामगिरी पाहता, त्याला वनडे संघात स्थान मिळणं कठीण दिसून येत आहे.

संजूला संधी मिळणं कठीण, पण कारण काय?

भारताच्या टी-२० संघात केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडतोय. मात्र वनडे संघात त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळणं फार कठीण आहे. कारण यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतचं नाव टॉप लिस्टवर आहे. यासह केएल राहुल देखील यष्टीरक्षण करु शकतो. ही सर्व समीकरणं पाहता, संजूला चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी मिळणं खूप कठीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT