ICC Champions Trophy 2025 Schedule  India Today
Sports

Icc Champions Trophy सामन्यांचं वेळापत्रक जाहीर; कधी होणार टीम इंडियाचा पहिला सामना, कोणत्या संघाशी करणार दोन हात?

ICC Champions Trophy 2025 Schedule : आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक जाहीर केलंय. भारतीय संघाचा सामना कधी होणार? हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. भारताचा पहिला सामना पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. हा सामना २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना दुबईत खेळवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आज चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं. बोर्डाने सर्व संघांचे वेळापत्रक जाहीर केले असून यात सामने कुठे आणि कोणत्या संघाशी होणार याची माहिती देण्यात आलीय.

आयसीसीने भारताला सामावून घेण्यासाठी हायब्रीड मॉडेलला सहमती दिलीय. पीसीबी पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीबरोबरच या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. आयसीसीने वेळापत्रकाची माहिती सोशल मीडियावरुन दिलीय. या ट्रॉफीत अंतिम सामन्यासह एकूण १५ सामने होणार आहेत. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत.

या ८ संघाना ४-४ नुसार दोन गटात विभागण्यात आलंय. भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मार्की सामना २३ फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. या ट्रॉफीतील अंतिम फेरीत भारताचा संघ गेला तर क्रिकेट सामन्यांच मैदान बदलण्यात येणार आहे. हा अखेरचा सामना दुबई येथे होईल. तर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होईल. पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार असून हा सामना कराची येथे खेळण्यात येईल.

दरम्यान १९ फेब्रुवारीपासून सुरू होणारी चॅम्पियन ट्रॉफीचे सामने ९ मार्चपर्यंत चालतील. उपांत्य फेरी आणि अंतिम दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने IST दुपारी अडीच वाजता सुरू होतील. स्टार स्पोर्ट्स भारतातील सर्व सामन्यांचे प्रसारण करेल. पाकिस्तान आणि अरब अमिरातीमध्ये हे सामने होणार आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्डाने केलेल्या करारनंतर दोन ठिकाणी सामने आयोजित करण्याचं नियोजन करण्यात आलंय. या मॉडेल अंतर्गत, पाकिस्तानमध्ये १० सामने खेळवले जातील. तर भारताचे तीन लीग-स्टेज सामने दुबईत होतील. यात पाकिस्तान विरुद्धचे सामन्यांचा समावेश आहे. तर उपांत्य फेरीतील एक आणि अंतिम सामनाही दुबईतच होणार आहे.

जर भारत अंतिम फेरीत पोहोचला नाही तर शिखर सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. हा करार सर्व भागधारकांकडून सकारात्मक अभिप्राय मिळवून करण्यात आलाय.

चॅम्पियन्स ट्रॉफी गट

अ गट: बांगलादेश, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान

ब गट: अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका

वेळापत्रक पाहा-

१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची

२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

२१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची

२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

24 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

१ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची

२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*

५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**

९ मार्च - फायनल - गद्दाफी स्टेडियम, लाहोर**

जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT