rohit sharma saam tv
Sports

Champions Trophy: भारत- न्यूझीलंड सामन्यात विराट- रोहितकडून मोठी चूक? BCCI कारवाई करणार?

Anushka Sharma- Ritika Sajdeh In Dubai: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने काही नियम लागू केले होते.

Ankush Dhavre

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली.

यासह भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी जाऊन पोहोचला आहे. दरम्यान या सामन्यात असं काही घडलं ज्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघाला ३–१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने काही कडक नियम लागू केले होते. ज्यात खेळाडूंच्या कुटुंबाला सोबत ठेवण्याबाबतही मोठा निर्णय घेतला गेला होता.

यापूर्वी तुम्ही जितक्या स्पर्धा आणि मालिका पाहिल्या असतील, त्यात खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील सोबत असायचे. मात्र यावेळी असं काहीच पाहायला मिळालं नाही. २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यादरम्यान खेळाडूंच्या कुटुंबीयांनी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. कारण बीसीसीआयने केवळ एकाच सामन्यासाठी कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवण्याची सूट दिली होती.

रविवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही रितिका सजदेह आणि अनुष्का शर्मा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असल्याचे दिसून आले. एकाच सामन्याची परवानगी असताना रितिका आणि अनुष्का सामना पाहण्यासाठी कशी आली? बीसीसीआयचे नियम विराट – रोहितसाठी वेगळे आणि इतरांसाठी वेगळे आहेत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. तर दुसरी बाजू अशी की, विराट आणि रोहितने आपल्या कुटुंबियांना स्वखर्चाने दुबईत बोलवलंय का? असं असेल तर मग हा नियम इतर खेळाडूंनाही लागू होतो का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT