Under 19 World Cup 2024 saam tv news
क्रीडा

Under 19 World Cup 2024: ICC कडून U-19 टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा! मराठमोळ्या सचिन धससह भारताच्या ४ खेळाडूंचा समावेश

Ankush Dhavre

ICC Under 19 World Cup Team Of The Tournament:

भारत आणि ऑस्ट्रेलिया, आयसीसीची फायनल आणि भारतीय संघाचा पराभव. हे सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ फायनल, आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ आणि आता आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना गमवावा लागला आहे.

हा सामना भारतीय संघाने ७९ धावांनी गमावला आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर आयसीसीने टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा केली आहे. या संघात भारतीय संघातील ४ खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे.

ही स्पर्धा झाल्यानंतर आयसीसीने स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ११ खेळाडूंची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देणाऱ्या ह्यू वीबगेनकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघातील ३ खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह गोलंदाजी आक्रमणात भारतीय फिरकी गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.

या भारतीय खेळाडूंना मिळालं संघात स्थान...

आयसीसीने निवडलेल्या संघात भारताचा कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि सौम्य पांडेला स्थान दिलं गेलं आहे. या चारही खेळाडूंनी आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत दमदार खेळ करुन दाखवला आहे. या संघात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघातील ३ खेळाडू, यजमान दक्षिण आफ्रिका संघातील २,वेस्टइंडिज संघातील १ आणि पाकिस्तान संघातील १ खेळाडूला संघात स्थान दिलं आहे. (Cricket news in marathi)

असा आहे आयसीसीने निवडलेला अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सर्वोत्तम संघ:

लुआन ड्रे प्रीटोरियस (यष्टीरक्षक), हॅरी डिक्सन, ह्यू वीबगेन (कर्णधार), मुशीर खान, उदय सहारन, सचिन धास, नाथन एडवर्ड, कॅलम विडलर, उबेद शाह, क्वेना मफाका आणि सौम्य पांडे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT