icc umpires  saam tv
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्डकपसाठी अंपायर्सची यादी जाहीर! यादीत केवळ एकमेव भारतीय

Ankush Dhavre

Match Officials For ICC ODI World Cup 2023:

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला आता १ महिन्यापेक्षाही कमीचा अवधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. स्पर्धेतील ओपनिंगचा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.या स्पर्धेसाठी आयसीसीने २० ऑफिशियल्सची नावं जाहिर केली आहेत.

आयसीसीने सध्या साखळी फेरीतील सामन्यांसाठी ऑफिशियल्सची नावं जाहिर केली आहेत. तर नॉकआउट्स सामन्यांसाठी लवकरच ऑफिशियल्सची नावं जाहिर केली जाणार आहेत. आयसीसीने जी यादी जाहिर केली आहे. त्यात २० ऑफिशियल्समध्ये १६ अंपायर्स तर ४ मॅच रेफ्रिंचा समावेश आहे. या १६ पैकी १२ अंपायर्स हे आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील अंपायर्स असणार आहेत. तर ४ अंपायर्स हे आयसीसीच्या इमर्जिंग पॅनेलमध्ये असलेले अंपायर असणार आहेत.

एलिट पॅनेलमध्ये असलेले अंपायर्स: क्रिस्टोफर गॅफनी (न्यूझीलंड), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मरे इरास्मस (दक्षिण आफ्रीका), माइकल गॉफ (इंग्लंड), नितिन मेनन (भारत), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलब्रो (इंग्लंड) , रॉडनी टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (वेस्टइंडीज), अहसान रजा (पाकिस्तान) पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया), एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण अफ्रीका).

इमर्जिंग पॅनेलमध्ये असलेले अंपायर: शरफुदुल्ला इब्ने शाहिद (बांगलाद), पॉल विल्सन (ऑस्ट्रेलिया), एलेक्स व्हार्फ (इंग्लंड) आणि क्रिस ब्राउन (न्यूजीलंड). (Latest sports updates)

पहिल्या सामन्यासाठी हे असतील अंपायर्स..

या स्पर्धेतील पहिला सामना येत्या ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहेृ. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणारा हा सामना अहमदाबादच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी अंपायर्सची घोषणा करण्यात आली आहे.

नितिन मेनन आणि कुमार धर्मसेना हे दोघेही या सामन्यासाठी मुख्य अंपायर असणार आहेत. तर पॉल विल्सन तिसऱ्या आणि शरफुद्दौला हे चौथे अंपायर असणार आहेत. तसेच अँडी पायक्राफ्ट हे रेफ्रीच्या भूमिकेत असणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT