Jasprit Bumrah Icc award  Saam Tv
Sports

Jasprit Bumrah : पॅट कमिन्सवर जसप्रीत बुमराह ठरला वरचढ, ठरला आयसीसीच्या 'या' प्रतिष्ठित पुरस्काराचा मानकरी

Bumrah Award : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याच्यामुळे मालिकेतील भारताने पहिला सामना जिंकला. चांगल्या खेळामुळे आयसीसीने त्याचा सन्मान केला आहे.

Yash Shirke

Jasprit Bumrah News : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीने जसप्रीत बुमराहला डिसेंबर २०२४ साठी 'आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून घोषित केले आहे. यादीत त्याने पॅट कमिन्स आणि डेन पॅटरसनला मागे टाकले आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत जसप्रीत बुमराहने ९ डावांमध्ये १३.०६ च्या सरासरीने ३२ बळी घेतले. कसोटी मालिकेमध्ये बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. २० पेक्षा कमी सरासरीने कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारा बुमराह इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराहने कर्णधारपद सांभाळले होते. बुमराह कर्णधार असताना पहिला सामना भारताने जिंकला. पुढे शेवटच्या सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघातून रोहितला वगळण्यात आले होते. तेव्हाही बुमराहने कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमरित्या पेलावली होती.

जसप्रीत बुमराहने कसोटी मालिकेतील नऊ डावांमध्ये गोलंदाजी केली. त्यात त्याने पाच डावात त्याने पाच गडी बाद करत इतिहास रचला. जसप्रीत बुमराह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील बनला होता. बुमराहमुळे ऑस्ट्रेलिया विरोधात भारतीय संघ मैदानात टिकू शकला. तो नसता तर मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नसता असे चाहते म्हणत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT