Kapil Dev Statement: दोघेही दिग्गज खेळाडू, पण...रोहित- विराटच्या निवृत्तीबाबत कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

Kapil Dev Statement On Virat Kohli- Rohit Sharma: विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी क्रिकेटला रामराम करावं अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Kapil Dev Statement: दोघेही दिग्गज खेळाडू, पण...रोहित- विराटच्या निवृत्तीबाबत कपिल देव यांचं मोठं वक्तव्य
kapil devyandex
Published On

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली हे दोघेही नावाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे दोघांनीही निवृत्ती जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर रोहित आणि विराटने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. आता दोघेही केवळ वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत आहेत. मात्र या फॉरमॅटमध्येही दोघांची बॅट शांतच आहे.

त्यामुळे आता दोघांनी या फॉरमॅटलाही रामराम करावं मागणी सुरू आहे. दरम्यान याबाबत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Kapil Dev Statement: दोघेही दिग्गज खेळाडू, पण...रोहित- विराटच्या निवृत्तीबाबत कपिल देव यांचं मोठं वक्तव्य
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहितला पाकिस्तानात जावं लागणार; मोठं कारण आलं समोर

कपिल देव यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ' ते दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांना चांगलच माहित आहे, खेळण्याची योग्य वेळ कोणती आहे. जेव्हा त्यांना वाटेल की, ते आता खेळू शकणार नाहीत, तेव्हा ते निवृत्तीची घोषणा करतील.'

रोहित-विराटचा फ्लॉप शो सुरुच

रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांचाही फ्लॉप शो सुरुच आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दोघांची बॅट शांतच राहिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. मात्र त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. दुसरीकडे रोहित शर्मा तर पूर्णपणे फ्लॉप ठरला, त्याला ३ सामन्यात अवघ्या ३१ धावा करता आल्या. मुख्य बाब म्हणजे, जसप्रीत बुमराहने रोहित शर्मापेक्षा अधिक धावा केल्या.

Kapil Dev Statement: दोघेही दिग्गज खेळाडू, पण...रोहित- विराटच्या निवृत्तीबाबत कपिल देव यांचं मोठं वक्तव्य
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर! हा खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक

पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव बाहेर होता. त्याच्याजागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर शेवटच्या सामन्यात रोहितने खराब फॉर्ममुळे माघार घेतली होती. त्याच्याजागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. हा सामना भारतीय संघाला गमवावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com