Ricky Ponting Rishabh Pant fracture saam tv
Sports

Rishabh Pant: मला शंका येतेय की...! ऋषभ पंतच्या फ्रॅक्चरबाबत काय म्हणाला रिकी पॉन्टिंग?

Ricky Ponting Rishabh Pant fracture: चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. असं असूनही तो नंतर पुन्हा फलंदाजीला उतरला होता. यावरून रिकी पॉन्टिंगने शंका व्यक्त केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • ऋषभ पंतने दुखापत असूनही इंग्लंडविरुद्ध जिद्दीने अर्धशतक झळकावले.

  • पहिल्या दिवशी रिव्हर्स स्वीप करताना पंतच्या बोटाला दुखापत झाली होती.

  • रिकी पॉन्टिंगने पंतच्या फलंदाजीवर शंका व्यक्त करून टीका केली.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत मोठ्या जिद्दीने फलंदाजीला उतरला. पायाला दुखातप झाली असताना देखील त्याने दमदार अर्धशतकही ठोकलं. पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर काही अहवालात पंतला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं होतं.

मात्र बीसीसीआयने अधिकृतरीत्या फ्रॅक्चरविषयी काहीही जाहीर केलेलं नव्हतं. म्हणूनच पंतला दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना पाहिल्यानंतर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पोंटिंगनेही टीका करत शंका व्यक्त केलीये. त्याच्या म्हणण्यानुसार, जर हाड मोडलं असतं तर तो अशा प्रकारे मैदानात उतरलाच नसता.

काय म्हणाला रिकी पॉन्टींग?

स्काय स्पोर्ट्स क्रिकेटशी बोलताना पॉन्टींग म्हणाला की, दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला विकेट पडूनही पंत लगेच मैदानात आला नाही. तेव्हा सर्वांनाच वाटलं की तो कदाचित फलंदाजीला येणार नाही. मैदानावर वेगवेगळ्या अफवा पसरल्या हाड मोडलं आहे, तो सहा महिने बाहेर राहील पण अजून काही स्पष्ट नाही. कमेंट्रीदरम्यान मी ऐकलं होतं, की जर खरंच फ्रॅक्चर असेल आणि पुन्हा त्या जागी त्याला दुखापत झाली असेल तर स्थिती बिघडू शकते. त्यामुळे तो बॅटिंगसाठी उतरला याचा अर्थ, कदाचित फ्रॅक्चर नसावं अशी मला शंका वाटते.

पंतच्या जिद्दीचं केलं कौतुक

पॉन्टींगने पुढे पंतच्या जिद्दीचं कौतुक करत म्हटलं की, पंतने त्याच्या टीमसाठी शक्य ते सर्व काही केलं. भारतासाठी पहिल्या डावाच्या शेवटी ते रन्स अत्यंत महत्त्वाचे ठरले. सध्याच्या भारतीय टीमबद्दल हेच सांगता येईल की, ते काहीही करू शकतात. विशेषतः अशा कसोटीमध्ये जिथे सिरीज 2-1 ने इंग्लंडकडे आहे.

रिकी पुढे म्हणाला की, आजच्या खेळात रनरची परवानगी नाही, पण जेव्हा एखाद्या फलंदाजाला सर्वांसमोर स्पष्टपणे दुखापत दिसते तेव्हा संपूर्ण खेळ थांबतो आणि तो धावू शकत नाही अशा वेळी कदाचित पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. कारण अशा परिस्थितीत दुसऱ्या फलंदाजावर दबाव वाढतो.

ऋषभ पंतची झुंजार खेळी

पंतच्या या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 358 रन्स केले आहेत. प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाखेरीस 2 विकेट गमावून 225 रन्स केले आहेत. भारताकडे अजूनही 133 रन्सची आघाडी आहे. सिरीजमध्ये इंग्लंड 2-1 ने आघाडीवर असल्याने ही टेस्ट भारतासाठी सिरीज बरोबरीत आणण्याची संधी आहे. त्यामुळे पंतची अर्धशतकी कामगिरी फक्त रन्सच्या दृष्टीनेच नव्हे, तर ड्रेसिंग रूममधील आत्मविश्वासासाठीही प्रचंड महत्त्वाची ठरली आहे.

ऋषभ पंतला दुखापत केव्हा झाली?

पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली.

दुखापतीच्या बाबतीत बीसीसीआयने काय भूमिका घेतली?

बीसीसीआयने फ्रॅक्चरची अधिकृत पुष्टी किंवा नाकारण जाहीर केलेली नाही .

रिकी पॉन्टिंगने पंतच्या फलंदाजीवर शंका का व्यक्त केली?

कारण हाड मोडलं असतं तर तो फलंदाजीसाठी उतरला नसता , असे त्याचे मत आहे.

ऋषभ पंतच्या खेळीचा भारतावर काय प्रभाव झाला?

पंतच्या जिद्दीच्या खेळीमुळे भारताला 358 रन्स करत 133 रन्सची आघाडी मिळाली.

या टेस्टचे महत्त्व काय आहे?

सिरीज 2-1 ने इंग्लंडच्या आघाडीवर असल्याने, भारतासाठी ही सिरीज बरोबरीत आणण्याची महत्त्वाची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT