I am used to it now says yuzvendra chahal on not picked up in team india's world cup squad  Saam tv news
Sports

World Cup 2023: ' आता सवय झालीये..' वर्ल्डकप संघातून वगळल्यानंतर चहलची पहिली प्रतिक्रिया! इमोशनल होत म्हणाला..

Yuzvendra Chahal Statement: युजवेंद्र चहलने वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023, Yuzvendra Chahal Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सराव सामना इंग्लंडविरुद्ध होणार होता. मात्र हा सामना पावसामुळे धुतला गेला आहे.

या स्पर्धेसाठी कुलदीप यादव आणि आर अश्विन या फिरकीपटूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. तर युजवेंद्र चहलला या स्पर्धेसाठीही भारतीय संघात स्थान देण्यात आलं नाही. आता त्याने याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

विस्डेनच्या वृत्तानुसार, युजवेंद्र चहलने म्हटले की, ' ' मला माहितेय की, केवळ १५ खेळाडूंना संघात स्थान दिलं जातं. कारण ही वर्ल्डकप स्पर्धा आहे. मला ही थोडं वाईट वाटतंय. पण आयुष्यात माझं एकच धैय्य आहे, पुढे जात राहायचं. मला आता सवय झाली आहे. आतापर्यंत ३ वर्ल्डकप स्पर्धांमध्ये असं झालं आहे.' त्यानंतर तो हसू लागला.

अनलकी चहल..

युजवेंद्र चहल २०१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघासाठी खेळताना दिसून आला होता. मात्र त्यानंतर त्याला संघात संधी मिळणं कमी झालं. २०२१ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं.

त्यानंतर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगला होता. या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली खरी मात्र, शेवटच्या सामन्यापर्यंत त्याला बाकावर बसावं लागलं. (Latest sports updates)

चहलला संघात स्थान न देणं हा आश्चर्यचकित करणारा निर्णय आहे असं अनेक दिग्गज खेळाडूंचं म्हणणं आहे. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंग आणि युवराज सिंग त्याला सपोर्ट करताना दिसून आले होते.

या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी अनुभवी गोलंदाज आर अश्विनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT