MS Dhoni
MS Dhoni saam tv
क्रीडा | IPL

धोनीनं जगाला जे शिकवलं, त्याचेच परिणाम टीम इंडिया भोगतेय, माजी कर्णधार म्हणाला...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : टी20 वर्ल्डकपच्या ग्रुप 2 मधील सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या एका माजी कर्णधारानं मतप्रदर्शन केलं आहे. आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरनं (david miller) 46 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी करून कठीण परिस्थितीतही विजय संपादन करून दिलं.

या सामन्यात भारतानं वीस षटकात 9 विकेट्स गमावून 133 धावाच केल्या होत्या. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीनं भारतीय फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. चार षटाकात 29 धावा देऊन लुंगीनं 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 134 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकन फलंदाजांची पॉवर प्ले मध्ये दाणादाण झाली. अवघ्या 24 धावांवर आफ्रिकेनं तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर एडिन मार्क्ररम आणि डेव्हिड मिलरनं विजयी भागिदारी रचली. (Ajay jadeja gives statement about ms dhoni and david miller)

माजी कर्णधार अजय जडेजा म्हणाला...

डेव्हिड मिलरच्या अप्रतिम खेळीनं मला प्रभावित केलं. आफ्रिकेचा संघ कमालीचा दबावात असताना मिलर मात्र सावध खेळी करत होता. तो दबावात खेळत नव्हता. विरोधी संघाकडून काहीतरी चूक होईल, या संधीची तो वाट पाहत होता. त्यामुळेचं मिलरनं आफ्रिकेचा खेळ लांबवला आणि हेच धडे महेंद्र सिंग धोनीनं संपूर्ण जगाला दिले आहेत.याच कारणामुळं भारतीय संघ अशा परिस्थितीतून जात आहे.

मिलरनं सावध खेळी करत अतिशय शांतपणे मैदानात फलंदाजीचा तग धरला. विरोधी संघाच्या चुकीची वाट पाहत संघासाठी मोठी धावसंख्या रचण्याचा मिलरचा इरादा होता. माझ्याकडून लवकर चूक होणार नाही, असा ठाम निर्धार मिलरनं केला होता. मिलरनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखीच फलंदाजी केली. शेवटच्या षटकापर्यंत त्याने फलंदाजी करून खेळ चालूच ठेवला.धोनीनं बाकिच्यांना जे शिकवलं त्याच्याच परिणाम आता आपल्याला भोगावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

SCROLL FOR NEXT