अलिकडेच,अनेक भारतीय क्रिकेटपटू जसे की, विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आता या लिस्टमध्ये चेतेश्वर पुजाराचे नाव देखील जोडण्यात आले आहे. बीसीसीआयने आपल्या माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर सामने खेळणाऱ्या खेळांडूना प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून देते. ही रक्कम खेळाडूंच्या सामन्यांची संख्या आणि खेळाच्या स्तरानुसार ठरवली जाते. बीसीसीआय रिटारयमेंटनंतर खेळाडूंना किती पेन्शन देते आणि वर्षानुवर्षे हे किती वाढते, जाणून घेऊयात.
बीसीसीआयकडून खेळाडूंना मिळते पेन्शन
बीसीसीआयच्या या पेन्शन योजनेमध्ये खेळाडूचे वय ही महत्वाची भूमिका बजावते. खेळाडूंच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या पेन्शनची रक्कम देखील वाढते. उदाहरणार्थ, एखाद्या खेळाडूने वयाची ६० वर्षे ओलांडली असेल तर त्याच्या पेन्शची रक्कम देखील वाढवली जाते.
दरवर्षी का वाढवली जाते पेन्शनची रक्कम
रिपोर्ट्सनुसार, दरवर्षी पेन्शनमध्ये वाढ केली जात नाही, परंतु बीसीसीआय वेळोवेळी या रक्कमेमध्ये बदल करत असते. गेल्या काही वर्षात अनेक खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली. महागाई आणि बदलत्या काळात क्रिकेटपटूंना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी बीसीसीआयकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कोणत्या खेळाडूंना मिळणार फायदा
ज्या क्रिकेटपटूंनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत किंवा दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये योगदान दिले आहे, तेच खेळाडू या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये महिला क्रिकेटपटूंना देखील पेन्शनचा लाभ मिळतो. तसेच, पंच आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीही वेगळी पेन्शन योजना तयार करण्यात आली आहे.
किती मिळते पेन्शन?
गेल्या काही वर्षांमध्ये बीसीसीआयने खेळाडूंच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची पेन्शन दरमहा ३७,५०० रुपयांवरुन ६०००० रुपये करण्यात आली आहे. तर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची पेन्शन दरमहा १५००० रुपयांवरुन ३०००० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय, ज्या वरिष्ठ खेळाडूंना आधी दरमहा ५०००० पेन्शन मिळत होती, आता त्यांना ७०००० रुपये मिळणार आहे.