paris olympics yandex
क्रीडा

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत किती खेळ खेळले जातील? या 5 नव्या खेळांचा समावेश

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत सुरु राहणाऱ्या या स्पर्धेत खेळाडू आपल्या देशाचा मान वाढविण्यासाठी जोर लावताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेत एकूण १०,५०० खेळाडू मैदानात उतरणार आहे. मात्र तुम्हाला माहितेय का,पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत किती खेळांचा समावेश असणार आहे? नाही माहित ना? जाणून घ्या.

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सिटी ऑफ लव्ह म्हणजे, पॅरिस सजलंय. इथेच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण ३२ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या ३२ खेळातील ३२९ इव्हेंट्समध्ये खेळाडू आपलं नशीब आजमवताना दिसून येणार आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत ५ नव्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात काईटबॉर्डिंग, कायक क्रॉस, स्विमिंग आणि मॅरेथॉन रेस वॉक रिले आणि मेन्स ऑर्टिस्टिक या खेळांचा समावेश आहे. या ५ खेळांचा समावेश केल्यानंतर खेळांची संख्या ३२ वर जाऊन पोहोचली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला अधिकृतरित्या २६ जुलैला सुरुवात होणार आहे. यादिवशी भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र उद्घाटन सोहळ्यापूर्वी २४ जुलै रोजी काही फुटबॉल आणि रग्बी या खेळांना सुरुवात होणार आहे.

यावेळी भारताकडून ११३ खेळाडू पदकावर नाव कोरण्यासाठी पॅरिसला रवाना झाले आहेत. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७ पदकं जिंकली होती. ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १० पदकं जिंकली आहेत. यावेळी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT