न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात भयंकर घटना घडली. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला गंभीर दुखापतीमुळं मैदान सोडावं लागलं. त्याला मैदानातून अॅम्बुलन्समधून घेऊन जावं लागलं.
पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना माउंट माउंगानुईच्या बे ओव्हलमध्ये खेळवण्यात आला. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गंभीर जखमी झाला. न्यूझीलंडच्या फिल्डरने नॉन स्ट्रायकर एंडला जोरात थ्रो फेकला. तो थेट इमामच्या जबड्यावर लागला. गंभीर दुखापत झाल्यानं इमामला मैदानातून अॅम्ब्युलन्समधून बाहेर न्यावं लागलं.
इमाम स्ट्राइकला होता. विलियम ओरार्की यानं त्याला चेंडू फेकला. इमामनं तो ऑफ साइडच्या दिशेने टोलवला आणि एक रन घ्यायला धावला. पण न्यूझीलंडच्या फिल्डरनं नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला. तो थेट इमामच्या हेल्मेटमधून जबड्यावर आदळला. वेदनेने विव्हळणाऱ्या इमामने धावता धावताच आपल्या डोक्यावरचा हेल्मेट काढला. चेंडू बाहेर काढून त्यानं जबडा पकडून ठेवला. मैदानातच तो कोसळल्यानं खेळाडू आणि मैदानातील प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
इमाम चेंडू लागल्यानं गंभीर जखमी झाला होता. मैदानातील मेडिकल स्टाफनं तात्काळ मैदानात धाव घेतली. त्याची तपासणी करून पुढच्या उपचारासाठी त्याला अॅम्ब्युलन्समधून मैदानातून बाहेर नेलं. ही घटना घडली त्यावेळी इमाम एका धावेवर खेळत होता.
मैदानात नेमकं काय घडलं?
विलियम ओरार्की यानं तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू फेकला. इमामने तो चेंडू ऑफ साइडला टोलवला आणि धावला. फिल्डरने एक धाव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानं जोरात थ्रो केला. पण तो चेंडू इमामच्या हेल्मेटमध्ये जाऊन अडकला. हेल्मेटमधून तो चेंडू इमामच्या जबड्यावर लागला होता. इमाम वेदनेने विव्हळत होता. त्यानं तात्काळ हेल्मेट काढलं. फिजिओ मैदानात धावले. त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतरही वेदना काही कमी झाल्या नाहीत. अखेर त्याला अॅम्ब्युलन्समधून बाहेर घेऊन गेले. इमाम रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी बाबर आझम मैदानात फलंदाजीसाठी आला. तसेच कन्कशन सब्स्टीट्युट म्हणून उस्मान खानला घेण्यात आलं.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दोन्ही सामने पाकिस्ताननं गमावले आहेत. तिसऱ्या सामन्यात त्यांना विजयासाठी २६९ धावा करायच्या होत्या. चांगली सुरुवात होऊनही पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली. पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव झाला. या विजयासह न्यूझीलंडनं मालिका ३-० ने खिशात घातली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.