robin uthappa yandex
क्रीडा

Hong Kong Super Sixes साठी टीम इंडियाची घोषणा! केव्हा, कुठे अन् कधी रंगणार सामने? इथे पाहा LIVE

Ankush Dhavre

Hong Kong Super Sixes Live Telecast And Match Details: भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आणखी एका स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची जबाबदारी माजी खेळाडू रॉबिन उथप्पाकडे सोपवण्यात आली आहे.

हाँगकाँगमधील सुपर सिक्स स्पर्धा ही जगप्रसिद्ध आहे. गेले काही वर्ष ही स्पर्धा बंद पडली होती. मात्र हाँगकाँग क्रिकेट असोसिएशनने पुन्हा एकदा या स्पर्धची घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची धूरा रॉबिन उथप्पाकडे असणार आहे. रॉबिन उथप्पासह ७ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रॉबिन उथप्पा (कर्णधार) केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली,स्टूअर्ट बिन्नी, श्रीवस्त गोस्वामी.

केव्हा होणार सुरुवात?

हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धेला येत्या १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना ३ नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

ही स्पर्धा हाँगकाँगमध्ये होणार आहे. मात्र तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की, या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहायला मिळेल. तर या स्पर्धेतील सामने तुम्ही स्टारस्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह या स्पर्धेबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला www.saamtv.esakal.com वर पाहायला मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Baba Siddique: नगरसेवक ते मंत्री.. मुंबईमधील बाहुबली नेता, बॉलिवूडमध्येही दबदबा; कोण होते बाबा सिद्दीकी?

CM Eknath Shinde : बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचं हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले कारवाईचे आदेश

Baba Siddiqui Firing: मुलाच्या कार्यालयाबाहेरच मारेकऱ्यांनी झाडल्या गोळ्या, असा घडला बाबा सिद्धिकींवरील गोळीबारचा थरार

IND vs BAN 3rd T20: टीम इंडियाने विजयाचं सोनं लुटलं! रेकॉर्ड ब्रेकिंग विजयासह बांगलादेशचा सुपडा साफ

Baba Siddique Death : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या; मुलाच्या कार्यालयाबाहेर झाला गोळीबार

SCROLL FOR NEXT