सातारा : दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांबपटू हिमानी उत्तम परब हिला नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारी हिमानी हि देशातील आणि महाराष्ट्रातील पहिली खेळाडू ठरली आहे. हिमानी हिने आजपर्यंत शंभर पेक्षा अधिक पदकांची लयलूट केली असून जागतिक मल्लखांब स्पर्धेतही उत्तम कामगिरी केली आहे. येत्या १३ नाेव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते दिल्लीत हाेणा-या कार्यक्रमात हिमानीस अर्जुन पुरस्कारने गाैरविले जाणार आहे. अर्जुनाची प्रतिमा, प्रमाणपत्र, १५ लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. himani parab will receive arjuna award for mallakhamb
हिमानी हिची माेठी बहिण देखील मल्लखांबपटू हाेती. हिमानी देखील बहिणीपाठाेपाठ यश मिळवू लागली. ती सध्या समर्थ व्यायाम मंदिर येथे नवख्यांना मल्लखांबचे धडे देत आहे. हिमानी म्हणाली उदय देशपांडे यांच्यासह नीता ताटके, श्रेयस म्हस्कर, अस्मिता नायक, आदिती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाबराेबरच सरावात मदत करणा-या सर्व सहका-यांमुळे हा पुरस्कार मिळाला आहे.
मल्लखांब खेळाचे खूप फायदे आहेत. जसे माझ्या प्रशिक्षकांनी (उदय देशपांडे) मला घडविले तसंच मी राज्य ते आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू घडविण्याचा मानस हिमानीने व्यक्त केला. ती म्हणाली सध्या मी पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या पहिल्या मल्लखांब जागतिक स्पर्धेत चार सुवर्ण आणि दोन कास्यपदक पटकाविल्याने हा पुरस्कार मला जाहीर झाला आहे. मल्लखांब खेळास आज केंद्र शासनाने अर्जुन पुरस्कारासाठी मान्यता दिल्याने पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि क्रीडा क्षेत्रासाठी झटणा-या सर्वांचे मनपुर्वक आभार मानते.
हिमानीला मिळालेल्या पुरस्कारामुळे काेकणात देखील जल्लाेष करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रासह राजकीय नेते देखील हिमानीचे काैतुक करीत आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी हिमानीचे सिंधूकन्या असा उल्लेख करीत अर्जुन पुरस्कार मिळाल्याने काैतुक व अभिनंदन केले आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.