भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. या बॉक्सिंग डे कसोटीला आजपासून सुरुवात झाली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. या सामन्यात १९ वर्षीय सॅम काँटासला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. आपलाच पहिलाच सामना खेळत असलेल्या सॅम काँटासने वाकडे तिकडे शॉट खेळून भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणलं. दरम्यान चौकार - षटकार मारत असताना त्याचा सामना विराट कोहलीसोबत झाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना भारताकडून ११ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर काँटासने २ धावा घेतल्या.
त्यावेळी विराट कोहली आणि काँटासची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती, की काँटास विराटकडे रागात पाहतच राहिला. ज्यावेळी हे घडलं, त्यावेळी काँटास चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होता.
विराट कोहली मैदानात असताना,आपल्या आक्रमकतेमुळे ओळखला जातो. यावेळीही विराट आक्रमक दिसून आला. दोघांमध्ये बाचाबाची सुरु होती, त्यावेळी अंपायर मध्ये आले आणि त्यांनी दोघांमधील वाद मिटवला. १९ वर्षीय सॅम काँटासचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.
पहिल्याच सामन्यात फलंदाजी करताना त्याने जसप्रीत बुमराहच्या षटकात दमदार फलंदाजी केली. त्याने बुमराहच्या या षटकात १८ धावा चोपल्या. या दमदार फलंदाजीसह त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
जसप्रीत बुमराह या मालिकेत सर्वाधिकगडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने या मालिकेत गोलंदाजी करताना सर्वाधिक २६ गडी बाद केले आहेत. दरम्यान सॅम काँटासने फलंदाजी करताना जसप्रीत बुमराहच्या षटकात रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
त्याने जसप्रीत बुमराहच्या षटकात २ चौकार आणि १ षटकार मारला. काँटासने रिव्हर्स स्विप षटकार मारला. यादरम्यान तो १११२ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.