सोमवारी वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बंगळूरूने मुंबईला १२ रन्सने पराभूत केलं. रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी हा सामना महत्त्वाचा होता कारण या सामन्यात त्याचं कमबॅक होणार होतं. परंतु या सामन्यात देखील रोहित शर्मा फेल गेल्याचं दिसून आलं.
लखनऊ विरूद्धच्या सामन्यात रोहित गेल्या खेळला नव्हता. पण बंगळूरूच्या सामन्यात त्याने कमबॅक केलं. दरम्यान रोहितचं टीममध्ये स्थान आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. दरम्यान खुद्द टीमनेच याचे पुरावे दिले आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं. टीमने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मात्र यानंतर मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवलं. हिटमॅनच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं. रोहितची आता टीममध्ये पूर्वीसारखी पकड राहिलेली नाही. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध रोहितला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. दुखापतीमुळे तो टीमचा भाग नसल्याचे सांगण्यात आलं.
मुंबई इंडियन्सच्या एक्स हँडलवर नजर टाकली तर रोहितबद्दल सध्या खूप कमी पोस्ट शेअर केल्या जातात. तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांची पोस्ट पाहायला मिळणार आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर टीममध्ये वाद निर्माण झाला होता, असा दावा अनेक रिपोर्टनुसार करण्यात आलेला. दरम्यान त्याने आता पुन्हा एकदा संकेत मिळू लागलेत. लखनऊ विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित मैदानावर झहीर खानशी संवाद साधत होता. रोहितने झहीरला सांगितले की, त्याला जे करायचे होते ते त्याने केलं.
दरम्यान मुंबईच्या टीममध्ये सध्या वातावरण कसं आहे याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र एकंदरीत पाहता सध्या संपूर्ण कमान हार्दिक पंड्याच्या हातात असल्याचं पाहायला मिळतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.