Vijay Hazare Trophy  Twitter
क्रीडा

Vijay Hazare Trophy: हरियाणाने पहिल्यांदा जिंकली विजय हजारे ट्रॉफी, अंतिम सामन्यात राजस्थानचा पराभव

Bharat Jadhav

Haryana Won First Time Vijay Hazare Trophy 2023:

विजय हजारे ट्रॉफी अंतिम सामन्याने प्रेक्षकांचा धकधक वाढवली. कधी राजस्थानचा संघ बाजी मारेल असं वाटत होतं. तर कधी हरिण्याच्या संघाच्या पारड्यात विजय जात होता. यंदाची विजय हजारेची ट्रॉफी कोणाकडे जाईल, हे शेवटपर्यंत समजत नव्हतं. परंतु शेवटी हरियाणाने ३० धावांनी विजय मिळवला. या टूर्नामेंटमध्ये हरियाणाचा एकदाही पराभव झाला नाही. अंतिम सामन्यात अंकित कुमारने सुंदर खेळ खेळत ८८ धावा केल्या. या धावांच्या मदतीने संघाने ५० षटकात ८ विकेट गमावत २८७ धावा केल्या होत्या.(Latest News)

अभिजीत आणि कुणाला खेळात भरला रंग

अंतिम सामन्यात (Final Match) मिळालेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात खराब राहिली. राजस्थान संघाने (Rajsthan) अवघ्या १२ धावांमध्ये तीन विकेट गमावल्या होत्या. कर्णधार दीपक हुडादेखील चांगली खेळी करू शकला नाही. यानंतर अभिजीत तोमर आणि कुणाल सिंह राठोडसोबत त्यांनी पाचव्या गडीसाठी १२१ धावांची भागीदारी केली.

या दोघाच्या भागीदारीने राजस्थान संघाने खेळात वापसी केली. या दोघांची भागीदारी हरियाणासाठी चिंतेचा विषय बनली होती. या खतरनाक भागीदारीला हरियाणाच्या हर्षल पटेलने तडा दिला. पटेलने अभिजीतला बाद करत राजस्थानच्या संघाची चिंता वाढवली. अभिजीतने या सामन्यात १२९ चेंडूमध्ये १० चौकार आणि २ षटकार लगावत १०६ धावा ठोकल्या. दरम्यान हर्षलने अभिजीतसह कुणाल सिंहला देखील तंबूत परत पाठवलं. कुणालने ६५ चेंडूमध्ये ७९ धावा केल्या. या दोघांच्या जबरदस्त खेळीनंतरही राजस्थानचा संघ फक्त २५७ धावा करू शकला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हरियाणाकडून गोलंदाजी करताना हर्षल आणि सुमितने ३-३ विकेट घेतले. तर अंशुल कंबोज आणि राहुल तेवतिया यांनी दोन-दोन विकेट घेतल्या. तर फलंदाजी करताना हरियाणा संघाचीही सुरुवात चांगली राहिली नाही. संघाने पहिली विकेट तीन धावांवर गमावली. यानंतर अंकितने हिमांशू राणासोबत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली, मात्र ४१ धावांवर हिमांशूच्या रूपाने हरियाणाने आपली दुसरी विकेट गमावली.

यानंतर अंकित आणि हरियाणा संघाचा कर्णधार अशोक मनेरिया यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंकितने ९१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८८धावांची खेळी केली. याशिवाय मनेरियाने ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळीही खेळली. या दोघांच्या खेळीमुळे हरियाणाला धावांपर्यंत मजल मारता आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: घराच्या बाहेर घार फिरतेय? हे आहेत संकेत?

Health Tip: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात.. आधी महिलेला धडक, नंतर कार थेट दुकानात , १ गंभीर जखमी

Viral Video: तरुणांना चढला नवरात्रीचा फिवर, ''जय माता दी'' म्हणत दिल्ली मेट्रोमध्ये गायलं गाणं; व्हायरल VIDEO ची जोरदार चर्चा

Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT