Harsha bhogle backed hardik pandya over criticism after becoming captain of mumbai indians amd2000 saam tv news
क्रीडा

Hardik Pandya News: 'हार्दिकची चूक तरी काय..?' पंड्याला ट्रोल करणाऱ्यांवर दिग्गज समालोचक भडकले

Harsha Bhogle On Hardik Pandya: मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला सध्या जोरदार टीकेचा सामना करावा लागतोय. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली होती.

Ankush Dhavre

Harsha Bhogle Statement On Hardik Pandya:

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला सध्या जोरदार टीकेचा सामना करावा लागतोय. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली होती. हा निर्णय क्रिकेट फॅन्सला आवडलेला नाही. त्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. याचा परिणाम मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीवर देखील दिसून आला आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ स्पर्धेतील सुरुावातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएल २०१५ पासून हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात होता. त्यानंतर २०२२ स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावापूर्वी त्याला रिलीझ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संधीचा फायदा घेत गुजरात टायटन्स संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिलं आणि संघातं कर्णधारपदही दिलं. त्याने पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवलं आणि दुसऱ्या हंगामात संघाला फायलनपर्यंत पोहचवलं.

दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा एकदा आपल्या संघात स्थान दिलं आणि रोहितला कर्णधारपदावरुन काढून नेतृत्वाची जबाबदारी देखील सोपवली. याच कारणामुळे फॅन्समध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. मैदानात येताच त्याला बुइंग केलं गेलं. त्याच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. मात्र प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी हे सर्व चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. (Cricket news in marathi)

काय म्हणाले हर्षा भोगले?

क्रिकबझच्या एका कार्यक्रमात बोलताना हर्षा भोगले म्हणाले की, ' जे लोकं हात धुवून हार्दिक्या मागे लागले आहेत, त्यांना मला एकच विचारायचं आहे की, हार्दिकने काय चुक केली आहे? विचार करा, जर तुम्ही एका कंपनीत कामाला आहात आणि दुसऱ्या कंपनीतून चांगली ऑफर आली तर तुम्ही म्हणाल का ही ऑफर मला नकोय?'

हर्षा भोगले यांनी उदाहरण देत समजावून सांगितलं की, ' जरा विचार करा, तुम्ही एखाद्या कंपनीचे सीएफओ आहात आणि एखाद्या छोट्या कंपनीतून सीईओ पदाची ऑफर आली तर त्याला तुम्ही नाही म्हणणार आहात का? तुम्ही नक्कीच त्या ऑफरचा स्वीकार कराल. तुम्ही सीईओ म्हणून छोट्य कंपनीसाठी चांगलं काम करता आणि मग त्यानंतर तुमची जुनी कंपनी तुम्हाला बोलावून घेते. असंच काहीसं हार्दिक पंड्यासोबत झालं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT