Harry Brook and vinod kambli  Saam Tv
Sports

Harry Brook Record: हॅरी ब्रुकचा मोठा कारनामा! तब्बल २९ वर्षांनंतर मोडून काढला विनोद कांबळीचा वर्ल्ड रेकॉर्ड

Harry Brook Breaks Vinod Kambli Record: या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार शतक झळकावताच त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Cricket News: इंग्लंड संघातील फलंदाज हॅरी ब्रुक सध्या आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नुकताच न्यूझीलंड संघाविरुध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार शतक झळकावताच त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Latest Sports Updates)

हॅरी ब्रुकने गेल्या ९ इनिंगमध्ये चौथे शतक झळकावले आहे. यासह त्याने माजी भारतीय फलंदाज विनोद कांबळीचा मोठा विक्रम मोडून काढला आहे. तो कसोटी क्रिकेटधील पहिल्या ९ इनिंगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी हा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर होता. कांबळीने सुरुवातीच्या ९ इनिंगमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने दोन दुहेरी शतक आणि दोन शतकांसह ७९८ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रुकने आतापर्यंत ८०७ धावा केल्या आहेत. तर तो अजूनही फलंदाजी करत आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो.

कसोटी क्रिकेटमधील पहिल्या ९ इनिंगमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

हॅरी ब्रुक: ८०७ धावा

विनोद कांबळी - ७९८ धावा

हर्बर्ट सटक्लिफ - ७८० धावा

सुनील गावसकर -७७८ धावा

एवर्टन विक्स -७७७ धावा

जॉर्ज हेडली - ७०३ धावा

फ्रॅन्क वाॅरैल -६९५ धावा

सुनील गावसकरांचा विक्रम मोडण्यावर असेल नजर..

आता हॅरी ब्रुक सुनील गावसकरांचा विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात असणार आहे. सुरुवातीच्या ६ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सुनील गावसकरांच्या नावे आहे. सुनील गावसकर यांनी ९१२ धावा केल्या होत्या.

तर दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी ८६२ धावा केल्या होत्या. आता हॅरी ब्रुककडे या दोन्ही दिग्गजांना मागे सोडत नवा विश्वविक्रम रचण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT