harmanpreet kaur  saam tv
Sports

IND W vs BAN W: स्टम्प तोडणं अन् अंपायरवर भडकणं हरमनप्रीतला पडलं महागात; ICC ने केली मोठी कारवाई

Ban On Harmanpreet Kaur: या कृत्यानतंर हरमनप्रीत कौरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे

Ankush Dhavre

Harmanpreet Kaur Fined By ICC: भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार पार पडला. मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेश संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने कमबॅक करत मालिका १-१ ने बरोबरीत आणली होती.

दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. हा सामना बरोबरीत सुटल्याचं पाहायला मिळाले आहे. दरम्यान या सामन्यात वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

अंपायरवर भडकली हरमनप्रीत कौर..

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)फलंदाजी करत होती. त्यावेळी हरमनप्रीत कौरने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू पॅडला जाऊन धडकला.खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली.

मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. यावेळी रागात तिने बॅटही विकेटवर आपटली, त्यामुळे एक स्टंप पडला. इतकंच नाही तर हरमनप्रीत कौर परतताना अंपायरवर रागावतानाही दिसली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

या कृत्यानतंर हरमनप्रीत कौरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.आयसीसीने तिच्यावर काही सामन्यांसाठी बंदी घातली आहे. तसेच तिच्या मॅच फीवर ७५ टक्के दंड आकारला गेला आहे. (Latest sports updates)

सामना झाल्यानंतर काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

सामना झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने अम्पायरने हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली की, 'अम्पायरच्या चुकीच्या निर्णयामुळे निराश झाले आहे.' हे प्रकरण इथेच थांबला नाही तर, पुढे असं काही म्हटलं ज्यामुळे बांगलादेशच्या कर्णधाराला थेट फोटोसेशन सोडावं लागलं.

काय म्हणाली बांगलादेशची कर्णधार?

सामना झाल्यांनतर पत्रकार परिषदेत बोलताना बांगलादेश संघाची कर्णधार म्हणाली की, 'काही चर्चा आहेत ज्याचा खुलासा केला जाऊ शकत नाही. जे काही झालं त्यानंतर मला संघासोबत फोटो काढणं अयोग्य वाटलं. त्यामुळे मी तिथून निघून गेले.'

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जेव्हा ट्रॉफीसोबत फोटो शूट सुरु होतं त्यावेळी हरमनप्रीत कौर म्हणाली की, 'अम्पायरला पण बोलवा..' याचा अर्थ असा की, अम्पायर देखील बांगलादेश संघाच्या बाजूने होते.

हरमनप्रीत कौरने या सामन्यात जे काही केलं त्याचा तिला येणाऱ्या सामन्यांमध्ये मोठा फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT