IND vs PAK Asia Cup 2025 Saam Tv
Sports

IND vs PAK Asia Cup 2025 : हॅरिस रौफने डिवचायचा प्रयत्न केला, अभिषेक शर्माने माज उतरवला, मैदानावर नेमकं काय झालं? पाहा

Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज मात केली. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे भारताने १७२ धावांचं लक्ष्य ७ चेंडू शिल्लक ठेवून गाठलं. मात्र हारिस रउफच्या ‘६-०’ हातवाऱ्यामुळे सोशल मीडियावर वाद सुरू आहे.

Alisha Khedekar

  • आशिया कप २०२५ सुपर ४ मध्ये काल भारताने पाकिस्तानवर मात केली आहे.

  • अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाने १७२ धावांचं लक्ष्य गाठलं.

  • सामन्यापूर्वी हारिस रउफच्या ‘६-०’ हातवाऱ्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हारिस रउफला ट्रोल करण्यात आला आहे.

आशिया कप २०२५ सुपर ४ च्या दुसऱ्या सामन्यात काल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते मात्र टीम इंडियाच्या अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे ७ चेंडू आणि ६ विकेट्स शिल्लक असताना हे लक्ष्य सहज गाठले.असे असले तरी कालचा सामना चर्चेचा विषय ठरला आहे. या सामन्यापूर्वी गोलंदाज हारिस रउफचे हातवारे वादग्रस्त ठरले आहेत.

पाकिस्तानने गेली अनेक वर्ष देशात दहशतवाद पोसला. त्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. अनेक दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि क्रिकेटच्या मैदानातही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आशिया कप स्पर्धेत साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानसोबत हातमिळवणी केली नाही. त्यामुळे पाकिस्तान संघाचा जळफळाट झाला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाल्यानंतर वाटेल ते करू लागला. मग सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. तसेच युएईविरुद्धचा सामना खेळणार नसल्याची धमकी दिली. पण शेवटी नाक घासत मैदानात खेळणं भाग पडलं. काल पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ आमनेसामने आले. सुपर ४ फेरीतील भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ दुबईत सराव करत होता. या सरावादरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रउफने त्याच्या हाताने ६-० असा इशारा केला. तसेच ६-० असा जोराने ओरडत होता. या माध्यमातून तो ऑपरेशन सिंदूरवरून डिवचण्याचा प्रयत्न करत होता, असं म्हटलं जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर पार पाडलं. यावेळी दोन्ही देशात युद्धजन्य स्थिती होती. यावेळी पाकिस्तानने आणि तिथल्या मीडियाने भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला होता. आता हारिस रउफ तेच सांगत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे हारिस रउफला ट्रोल केलं जात आहे.असे असले तरी त्याने कोणाकडे पाहून असं केलं याबाबत अद्याप काही स्पष्टता नाही. हे हातवारे भारतावर केलेली व्यंग्यात्मक टिका होती की पाकिस्तान संघ आपापसात खेळत असलेल्या फुटबॉल सामन्याचा स्कोअर होता हे स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Recherge Plan: Vi चा 'हा' प्रीमियम प्लॅन Jio-Airtel पेक्षा महाग, पण मिळतात जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

रत्नागिरीत मनसेला धक्का; बडा नेता भाजपच्या गळाला लागला, शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार, परांड्यात १३१ जण पाण्यात अडकले, शेकडो जनावरांचा मृत्यू

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग, ६५०० बूथ अधिकारी अन्...; कसा आहे संपूर्ण प्लान?

Parbhani : परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT