mumbai-indians saam tv news
Sports

Hardik Pandya Reaction: मुंबईच्या ताफ्यात दाखल होताच हार्दिकची पहिली प्रतिक्रिया आली समोर; व्हिडिओ शेअर करत म्हणाला..

Hardik Pandya News: गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. दरम्यान संघात परतल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Back In Mumbai Indians:

तब्बल २ वर्षांनंतर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. २०१५ पासून ते २०२१ पर्यंत त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर पुढील २ वर्ष तो गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार होता.

आता पुन्हा एकदा तो आपल्या जुन्या संघात परतला आहे. दरम्यान आपला आनंद व्यक्त करत त्याने एक ट्वीट केलं आहे, जे सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Hardik Pandya Back In Mumbai Indians)

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

हार्दिक पंड्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. या व्हिडिओत त्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हार्दिक पंड्याने या व्हिडिओला हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहलंय की, माझ्या मुंबई, वानखेडे,पलटन सोबत खुप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. परत येऊन मस्त वाटतंय.' (Hardik Pandya Reaction)

हार्दिक पंड्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. हार्दिक पंड्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत १२३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १४५.८६ च्या स्ट्राइक रेटने आणि ३०.३८ च्या सरासरीने २३०९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीतही त्याने मोलाचे योगदान दिले आहे. त्याने गोलंदाजी करताना ५३ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

गुजरातला बनवलं चॅम्पियन...

मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स संघात प्रवेश केला. त्याला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. २०२२ मध्ये त्याने पहिल्याच हंगामात गुजरातला आयपीएल चॅम्पियन बनवलं. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने गुजरातला फायनलपर्यंत पोहचवलं . शेवटी फायनलमध्ये गुजरातला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT