Hardik Pandya saam tv
Sports

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

hardik pandya likely to miss england odi series due to injury : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर झाला आहे. हा भारतीय क्रिकेट संघाला सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

Nandkumar Joshi

युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील अखेरचा सामना आज, शनिवारी चेन्नईच्या मैदानात सुरू आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथं आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध दोन टी २० सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे.

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ टी २० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यूके दौऱ्यासाठी बीसीसीआयने टी २० संघाची घोषणा केलेली आहे. मात्र, इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयकडून पुढच्या आठवड्यात वनडे संघाची घोषणा केली जाऊ शकते. त्याआधी स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पंड्यासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे.

दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर राहणार आहे. या मालिकेसाठी त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. दुखापतीमुळे हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला नाही. आता तंदुरुस्त नसल्याने तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही खेळू शकणार नाही.

दुसरीकडे, आयपीएल २०२६ मध्ये दुखापतग्रस्त झालेला विराट कोहली देखील अजूनही त्यातून सावरलेला नाही. आयपीएल फायनलवेळी त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला नाही. आता त्याच्या फिटनेसबाबत अपडेट समोर आली आहे. त्याची एक टेस्ट २२ जून रोजी होणार आहे. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड निश्चित होणार आहे.

रिपोर्टनुसार, सीओईकडून विराटशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यासाठी रिहॅब प्रोग्राम निश्चित केला होता. विराट कोहली हा दुखापतीतून सावरत आहे. २२ जून रोजी विराट कोहली सीओईमध्ये जाणार आहे. त्यासाठी त्याची पुन्हा तपासणी होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ध्रुव जुरेल, केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी फिट असल्याचे कळते. सीओईचा अहवाल निवड समितीकडे पाठवल्याचे सांगितले जात आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा देखील आयपीएल दरम्यान दुखापतीमुळे त्रस्त होता. अफगाणिस्तान दौऱ्याआधीच तो दुखापतीतून सावरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT