hardik pandya relationship twitter
Sports

Hardik Pandya Relationship: नताशानंतर हार्दिक पंड्या या परदेशी सिंगरला करतोय डेट? PHOTO तुफान व्हायरल

Hardik Pandya Jasmin Walia: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Apurva Kulkarni

भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पंड्या पुन्हा प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे. हार्दिकचा ग्रीसमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हार्दिक पंड्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. घटस्फोट होऊन अवघे काही दिवस उलटले आहेत. आता पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, हार्दिक एका ग्रीक गायिकेच्या प्रेमात असून तिला डेट असल्याचं म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या आणि नताशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्यांनी घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. हा निर्णय दोघांनी मिळून घेतला आहे असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता. नेमकी चूक कोणाची? याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नव्हता. दोघांनी कुठलही स्पष्टीकरण दिलं नव्हतं.

रिपोर्टनुसार हार्दिक आणि जॅस्मीन ग्रीसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. दोघांनी आपापल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमुळे दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगत आहे. हे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दोघांच्या फोटोमागचा पुल सेम असल्याचा अंदाज घेत त्याच्या रिलेशनशिपबाबत चर्चा करायला सुरुवात केली आहे.

जॅस्मीनने एका निळ्या बिकिनीमधील हॉट फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले आहेत. या फोटोमध्ये जॅस्मीन निळ्या शर्टसोबत एका स्विमिंग पुलच्या बाजूला उभी आहे. तिच्या मागे मायकोनोसचे सुंदर दृश्य आहे. दुसरीकडे जॅस्मीनच्या पोस्टनंतर काही वेळातच हार्दिकने देखील स्विमिंग पुलाच्या आजू-बाजूला फिरतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये हार्दिकने क्रीम रंगाची पॅट घातली असून लाईनिंचा शर्ट घातला आहे. त्याच्याही मागे मायकोनोसचं सुंदर दृश्य आहे. त्यामुळे ते दोघे एकत्र असल्याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोपरगावातील नरभक्षक बिबट्या ठार, दहशत मात्र कायम

Wight Loss: जर तुम्हाला खरचं वजन कमी करायचं असेल, तर पुढील ३ महिने या ७ टिप्स फॉलो करा, व्हाल फॅट टू फिट

Stress Management: ऑफिसमधल्या वादामुळे झोप उडालीये? काळजी सोडा, 'ही' ट्रिक ठरेल फायद्याची

Pune : संशयित दहशतवादी हंगरगेकरची कुंडली समोर; पुण्यात १५ वर्ष कुठं काम करत होता? तपासात धक्कादायक माहिती उघड

Shocking : लग्न होत नव्हतं, डोक्यात शिरलं अंधश्रद्धेचं भूत; ४ मावशींनी केली १६ दिवसांच्या भाच्याची हत्या

SCROLL FOR NEXT