hardik pandya saam tv news
Sports

Hardik Pandya Replacement: हार्दिक पंड्याचं टीम इंडियातील स्थान धोक्यात? हा विस्फोटक फलंदाज घेऊ शकतो जागा

Shivam Dube: भारतीय संघात एक असा खेळाडू आहे जो हार्दिक पंड्याची जागा घेऊ शकतो. कोण आहे तो फलंदाज जाणून घ्या.

Ankush Dhavre

Shivam Dube Can Replace Hardik Pandya:

आगमी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या जून महिन्यात वेस्टइंडिज आणि अमरिकेत या सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आलं आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात या युवा खेळाडूंनी दमदार खेळ करुन दाखवला आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आक्रमक फलंदाज शिवम दुबेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४० चेंडूंचा सामना करत ६० धावांची खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान ५ चौकार आणि २ षटकार मारले.

त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जितेश शर्माने २० चेंडूंचा सामना करत ३१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार मारले होते. शेवटी शिवम दुबेला साथ देण्यासाठी रिंकू सिंग फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने ९ चेंडूत १६ धावा केल्या आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

हार्दिक पंड्याचा पत्ता कट?

हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे. मात्र त्याला दुखापतीमुळे या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रुमध्ये त्याला दुखापत झाली होती.

त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं असतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आणि सध्या सुरु असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबेला संधी दिली गेली आहे. या संधीचा फायदा घेत त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. यापूर्वी आयपीएल २०२३ स्पर्धेतही त्याला दमदार खेळ करुन दाखवला होता.

भारतीय संघाला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. त्यामुळे शिवम दुबे परफेक्ट ऑप्शन आहे. जर हार्दिक पंड्या टी-२० वर्ल्डकपसाठी पूर्णपणे फिट

नसेल तर शिवम दुबेला संघात स्थान दिले जाऊ शकते. तसेच त्याला बॅकअप ऑप्शन म्हणूनही संघात स्थान दिले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

Beed News: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचे वाजले तीन-तेरा|VIDEO

SCROLL FOR NEXT