चेन्नई सुपर किंग्ज संघातील अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याचं फॉर्ममध्ये येणं हे हार्दिक पंड्यासाठी चिंता वाढवणारं ठरु शकतं. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी हार्दिक पंड्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला काही महिने बाहेर राहावं लागलं होतं. फिट झाल्यानंतर त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक केलं आहे. मात्र कमबॅकनंतर त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.
एकीकडे हार्दिक पंड्या सुपरफ्लॉप ठरतोय तर दुसरीकडे शिवम दुबे आपल्या आक्रमक फलंदाजीने धुमाकूळ घालताना दिसतोय. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने २ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ५१ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर २०६ धावा केल्या होत्या.
हार्दिक पंड्याचा पत्ता कट होणार?
हार्दिक पंड्या सध्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करतोय. कर्णधार आणि फलंदाज म्हणून तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. पंड्याने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ११ धावा केल्या होत्या. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला अवघ्या २४ धाव करता आल्या.
ज्यावेळी संघातील इतर फलंदाज २०० च्या स्ट्राईक रेटने धावा करत होते. त्यावेळी हार्दिक पंड्या १२० च्या स्ट्राईक रेटने धावा करत माघारी परतला. फलंदाजीसह संघाचं नेतृत्व करताना देखील त्याने काही चुकीचे निर्णय घेतले. त्याची अशीच कामगिरी सुरु राहिली, तर शिवम दुबेला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी कन्फर्म सीट मिळू शकते. (Cricket news in marathi)
आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा येत्या १ जूनपासून सुरु होणार आहे. वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयपीएल सुरु असताना भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. शिवम दुबेने यापूर्वीही स्वत:ला सिद्ध केलं आहे. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याची बॅट चांगलीच तळपली होती. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी शिवम दुबेालाही प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.