hardik pandya captaincy complaint mumbai indians senior players not happy with his captaincy skills amd2000 twitter
Sports

Mumbai Indians: मुंबईच्या अपयशानंतर ड्रेसिंग रुममध्ये बरंच काही घडलं! वरिष्ठ खेळाडूंनी हार्दिकवर ठिकऱ्या फोडल्या

Mumbai Indians, Hardik Pandya: मुंबई इंडियन्स हा आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे.

Ankush Dhavre

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. या संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत या संघाला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हा संघ या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे. गतवर्षी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. तर यावेळी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

मुंबईच्या या फ्लॉप कामगिरीनंतर मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये फुट पडल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तर काही खेळाडूंनी हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता. गेली १० वर्ष संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली. या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहितचे समर्थक सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना दिसून आले होते.

कोणी केली तक्रार?

मुंबई इंडियन्स संघाला या हंगामातील पहिल्या सामन्यापासून हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. स्वत: हार्दिक पंड्या गोलंदाजीत आणि फलंदाजीतही फ्लॉप ठरला आहे. यादरम्यान हार्दिकने अनेक धक्कादायक निर्णय घेतले होते. आता इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, संघातील प्रमुख खेळाडूंनी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाबाबत टीम मॅनेंजमेंटकडे तक्रार केली आहे.

या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, मुंबई इंडियन्सच्या एका सामन्यानंतर संघातील खेळाडू आणि संघाच प्रशिक्षक यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता. तर एका अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी झाली होती. आता कर्णधारपद बदलण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये ताळमेळ बसत नाहीये. अशा गोष्टी जगभरातील संघांसोबत घडत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पाऊस; वसमतमध्ये अनेक गावात शिरले पुराचे पाणी, बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

SCROLL FOR NEXT