Sports

IPL 2024: होम ग्राऊंडवर प्रेक्षकांकडून हार्दिकची हेटाळणी; दिल्या रोहित-रोहित नावाच्या घोषणा

IPL 2024: आयपीएल २०२४ मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या मैदानात उतरला. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई आणि गुजरातच्या संघात सामना झाला.या होम ग्राऊंडवर हार्दिकला नामुष्की सहन करावी लागली. आयपीएलचा सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी हार्दिक समोर परत एकदा रोहित रोहित अशा घोषणा दिल्या.

Bharat Jadhav

Hardik Pandya Booed Video Ahmedabad :

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघाचा सामना झाला. यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्याला मुंबई संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिक पहिल्यांदाच मुंबई संघाचा कर्णधार म्हणून होम ग्राउंडवर उतरला होता. अभिमान वाटणाऱ्या क्षणावेळी हार्दिकला नामुष्की सहन करावी लागली.स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिकची हेटाळणी केली. (Latest News)

हार्दिक मागील आयपीएलच्या हंगामापर्यत गुजरात टायटन्सचा भाग होता. पण या हंगामाच्या लिलावापूर्वीच त्याला मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात आले. याशिवाय त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवण्यात आले. हीच गोष्ट चाहत्यांना आवडलेली नाही. हार्दिकने गुजरातचा संघ सोडल्याने तेथील चाहते त्याच्यावर नाराज आहेत.तर मुंबईच्या संघाचा खेळाडू रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यामुळे मुंबईतील चाहते सुद्धा त्याच्यावर नाराज आहेत.

सर्व बाजुंनी नाराजी सूर असताना आजच्या सामन्यात हार्दिकला अपमान सहन करावा लागला. मुंबई आणि गुजरात संघाचा सामन्याची नाणेफेक केली जात असताना रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याचं नाव घेतलं. त्यावेळी प्रेक्षकांनी हार्दिकला चिडवण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी रोहित शर्माला पाठिंबा देत त्याच्या नावाच्या घोषणा प्रेक्षकांनी दिल्या.

हार्दिकने पहिल्याच सामन्यात कर्णधार असल्याचा रुबाब दाखवण्यास सुरुवात केलीय. यावेळी त्याचा हट्टी स्वभाव अनेकांना दिसून आला. हार्दिकने रोहित शर्माला एका सामन्य खेळाडूप्रमाणे वागणूक देत असल्याने अनेक चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजपाने खाते उघडले

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

SCROLL FOR NEXT